Virat Kohli : सामना जिंकून देणाऱ्या विराटबद्दल क्रिकेटचा देव म्हणतो, शंकाच नाही की... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar On Virat Kohli

Virat Kohli : सामना जिंकून देणाऱ्या विराटबद्दल क्रिकेटचा देव म्हणतो, शंकाच नाही की...

Sachin Tendulkar On Virat Kohli : टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने गतवर्षी वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि टीम इंडियाने सहा गडी गमावून ते पूर्ण केले. भारताकडून विराट कोहलीने 82 धावांची शानदार खेळी खेळली आणि भारताला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: Virat Kohli : पाकविरूद्ध विजयी भार पेलणाऱ्या विराटला हिटमॅनने घेतले खांद्यावर, पहा Video

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 53 चेंडूंत 82 धावांची नाबाद खेळी करत त्याला सर्वोत्कृष्ट मानली आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने याला सहमती दिली आहे. भारताने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर कोहलीचे अभिनंदन करण्यासाठी भारताच्या दिग्गज माजी फलंदाजाने ट्विट करत लिहीले की, @imVkohli , निःसंशयपणे, ही तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी होती. तुला खेळताना पाहणे ही एक आनंदाची गोष्ट आहे, रौफ विरुद्ध लाँग ऑनच्या 19व्या षटकात बॅकफूटवर मारलेला षटकार नेत्रदीपक होता! ते चालू ठेवा.

हेही वाचा: Hardik Pandya : हर्दिक पांड्याचे पाणावले डोळे; बाबांची आठवण काढत म्हणाला..

मेलबर्नमध्ये सुमारे एक लाख लोकांसमोर विराट कोहलीच्या स्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 4 विकेट्सने हा सामना जिंकला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या होत्या, खेळपट्टी पाहता ही धावसंख्या खूपच अवघड वाटत होती. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद, शान मसूद यांनी अर्धशतक केले.

टीम इंडिया जेव्हा बॅटिंगला उतरली तेव्हा त्याची अवस्था खुप वाईट होती, कारण 31 च्या स्कोअरवर 4 विकेट पडल्या होत्या. यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यामध्ये शतकी भागीदारी केली, ज्याच्या जोरावर टीम इंडियाला बळ मिळाले. शेवटच्या षटकात भारताला 16 धावांची गरज होती, जी टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केली.