esakal | World Cup 2019 : आणखी एक सुपर ओव्हर खेळविणेच योग्य : सचिन
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 2019 : आणखी एक सुपर ओव्हर खेळविणेच योग्य : सचिन

विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे एखादा सामना दोनवेळा टाय झाला किंवा त्या सामन्याप्रमाणे अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवली तर जास्त चौकारांवर निकाल लावण्यापेक्षा आणखी एक सुपर ओव्हर खेळविण्यात यावी असा सल्ला मास्चर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला आहे. 

World Cup 2019 : आणखी एक सुपर ओव्हर खेळविणेच योग्य : सचिन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे एखादा सामना दोनवेळा टाय झाला किंवा त्या सामन्याप्रमाणे अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवली तर जास्त चौकारांवर निकाल लावण्यापेक्षा आणखी एक सुपर ओव्हर खेळविण्यात यावी असा सल्ला मास्चर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला आहे. 

''विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातच नव्हे, तर कोणत्याही स्पर्धेत सुपर ओव्हर टाय झाली तर आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात यावी,'' असे मत सचिनने व्यक्त केले.  

इंग्लंड आणि न्यूझींलड यांच्यात रविवारी (14 जुलै) लॉर्डसवर झालेल्या अंतिम सामन्यात सामना दोनवेळा टाय झाल्याने सर्वाधिक चौकारांच्या गणनेवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडने 16 तर इंग्लंडने 24 चौकार मारले होते.