Sachin Tendulkar Deepfake : माझी मुलगी सध्या हा गेम... सचिन तेंडुलकरने 'तो' Video शेअर करत केलं सर्वांना सावध

सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे
Sachin Tendulkar Deepfake video
Sachin Tendulkar Deepfake videoesakal

Sachin Tendulkar Deepfake Video : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून सचिन तेंडुलकरने सर्वांनाच सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

सचिनने त्याचा डीपफेक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन आपल्या मुलीबद्दल सारा तेंडुलकरबाबत सांगताना दिसतोय. या व्हिडिओतील फेक सचिन दावा करतो की त्याची मुलगी सारा तेंडुलकर एक ऑनलाईन गेम खेळून दिवसाला लाखो रूपये कमवते.

Sachin Tendulkar Deepfake video
Ajit Agarkar : एका निवडसमिती सदस्याचा पत्ता होणार कट, अजित आगरकर ठरणार कारण; BCCI ने मागवले अर्ज

मात्र सचिन तेंडुलकरने या व्हिडिओचा पर्दाफाश करत हा व्हिडिओ फेक असल्यांच आणि असल्या व्हिडिओपासून सावध राहण्याचं आवाहन केलं. सचिन म्हणाला की, 'हा व्हिडिओ खोटा आहे. तंत्रज्ञानाचा असा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू आहे हे पाहून खूप विचलीत झालो आहे. सर्वाना विनंती आहे की या व्हिडिओ जाहिरात आणि अॅपबद्दल मोठ्या संख्येने तक्रार करा.'

सचिन पुढे म्हणाला की, 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना याबाबत सावध राहण्याची आणि तक्रारींवर कारवाई करण्याची गरज आहे. त्यांच्याकडून होणारी कडक कारवाई ही डीपफेक व्हिडिओ आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना रोखण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते.'

Sachin Tendulkar Deepfake video
Ind vs Afg : टीम इंडियाच्या प्रिन्सला जयस्वालचा 'यशस्वी' धक्का.... वर्ल्ड कपमधूनही होणार गच्छंती ?

यापूर्वी सचिनची मुलगी सारा तेंडुलकरने देखील तिच्या पॅरडी अकाऊंटवरून होणाऱ्या पोस्टबद्दल तक्रार केली होती. सारा तेंडुलकरचे ट्विटवर अनेक अधिकृत पॅरडी अकाऊंट आहेत. या अकांऊटवरून होणाऱ्या पोस्ट या माझ्या नसून तेथे व्यक्त होणारी मते माझी आहेत असं गृहीत धरलं जावू नये अशी विनंती तिने फॅन्सना केली होती.

जगभरातील तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. मात्र या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर देखील वेगाने होत आहे. डीपफेक व्हिडिओचा फटका हा रष्मिका मंधाना पासून ते खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील बसला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com