Sachin Tendulkar Statue: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय! वानखेडेवर उभारणार सचिनचा पुतळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium

Sachin Tendulkar Statue: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय! वानखेडेवर उभारणार सचिनचा पुतळा

Sachin Tendulkar Statue in Wankhede Stadium : मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. याच मैदानावर या महान फलंदाजाने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. क्रिकेट अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या पुतळ्याचे अनावरण 23 एप्रिलला सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवसाला किंवा यंदाच्या विश्वचषकादरम्यान केले जाऊ शकते.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी इंडियन एक्सप्रेसला या घोषणेची पुष्टी केली. वानखेडे स्टेडियमवर हा पहिलाच पुतळा असेल, तो कुठे ठेवायचा हे आम्ही ठरवू, असेही ते म्हणाले.

अमोल काळे म्हणाले की, सचिन तेंडुलकर एक भारतरत्न आहे. त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. तो 50 वर्षांचा झाल्यावर हे MCA कडून कौतुकाची भेट असले. मी तीन आठवड्यांपूर्वी त्याच्याशी बोललो आणि त्याची संमती घेतली.

सचिन तेंडुलकरने वयाच्या सोहळ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. कसोटी कारकिर्दीमध्ये सर्वाधिक धावा करणार विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्याने 15 हजार 533 धावा केल्यात. सचिन तेंडुलकरने भारतासाठी 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (100) आणि धावा (34,357) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहेत.