IND vs AUS : पुन्हा खेळपट्टीची चर्चा! इंदूरलाही असणार फिरकीचे प्राबल्य?

उष्ण हवामानामुळे खेळपट्टी होणार अधिक कोरडी त्यामुळे...
IND vs AUS Indore Pitch Report
IND vs AUS Indore Pitch Reportsakal

India vs Australia Test Series : दुसरा कसोटी सामना तीन दिवसांत संपल्यामुळे दोन दिवसांची अतिरिक्त सुट्टी मिळाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी आता तिसऱ्या कसोटीसाठी घाम गाळायला सुरुवात केली. त्याचबरोबर पुन्हा खेळपट्टीची चर्चाही रंगू लागली. मुळात इंदूरच्या खेळपट्टीचा स्वभावगुण फिरकीस साथ देणारा आहे. त्यात आता उष्ण हवामानामुळे ती अधिक कोरडी होऊ लागली आहे. परिणामी, या कसोटीतही फिरकी गोलंदाजांचे प्राबल्य राहण्याची शक्यता आहे.(IND vs AUS Indore Pitch Report)

IND vs AUS Indore Pitch Report
Shardul Thakur Marriage: शार्दुल अखेर विवाहबंधनात! मिताली पारुलकरसोबत बांधली लग्नगाठ

दोन्ही संघ जवळपास आठवड्याच्या विश्रांतीनंतर इंदूरच्या होळकर मैदानावर तिसऱ्या कसोटीच्या तयारीला लागले आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या वेळी नागपूर आणि दिल्लीला हवा गार होती. इंदूरला सकाळ आणि संध्याकाळची हवा आल्हाददायक असली तरी दुपारी चांगले ऊन जाणवायला लागले आहे. भारतीय संघ सरावाला आल्यावर राहुल द्रविड आणि कप्तान रोहित शर्मा यांनी स्टेडियममध्ये आल्या आल्या खेळपट्टी गाठली.

होळकर मैदानाच्या खेळपट्टीवर चेंडू पडण्याच्या जागी अजिबात गवत दिसत नाही, तसेच खूप कोरडेही वाटत होते. म्हणजेच जी आव्हाने पहिल्या दोन कसोटीत पाहुण्या संघासमोर आ वासून उभी होती, तीच आव्हाने या कसोटीत सहन करावी लागणार आहे. इंदूरची हवा सकाळी सूर्य महाराज आकाशात अवतरल्यावर चांगलीच गरम होत असल्याने त्याचा परिणाम खेळपट्टीवर होणार आहे. हेच कारण असेल की खेळपट्टी बनवणारे माळी सतत त्यावर पातळ आच्छादन टाकून उन्हापासून बचाव करत होते.

IND vs AUS Indore Pitch Report
IND vs AUS India Playing 11 : पाठीवर राहुलचं ओझं वाहणारा रोहित देणार अक्षरचा बळी?

बदल परिणामकारक ठरणार?

दोन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघात बरेच बदल केले गेले, पण तिसऱ्यांदा झालेले बदल परिणाम साधणार आहेत असे वाटत आहे. कप्तान पॅट कमिन्स आपल्या आजारी आईसोबत राहण्यासाठी मायदेशी गेला असल्याने नेतृत्व अनुभवी स्टीव्ह स्मिथ करणार आहे. स्मिथ भूतकाळात झालेल्या चुकांची शिक्षा भोगून परत एकदा ऑस्ट्रेलियन संघाची धुरा सांभाळणार असल्याने चांगली कामगिरी करायची वेगळीच ईर्षा त्याच्या मनात असणार.

अनुभवी डेव्हिड वॉर्नर कोपराच्या दुखापतीने मालिकेतून बाहेर गेल्याचा तोटा ऑस्ट्रेलियन संघाला सहन करावा लागणार आहे, कारण बदली खेळाडू मॅट रेनशॉला फिरकीसमोर खेळताना काहीच फलंदाजी झेपत नसल्याचे जाणवते.

IND vs AUS Indore Pitch Report
Rishabh Pant IPL 2023 : सौरव गांगुली पंतच्या संपर्कात; पुनरागमनाबद्दल म्हणाला...

किमान ३०० धावांचे लक्ष्य

कसेही करून पहिल्या डावात फलंदाजी करताना ३०० धावांचा टप्पा कसा पार करता येईल याचा विचार ऑस्ट्रेलियन फलंदाज करत आहेत. मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन दुखापतीतून सावरून संघात परतणार असल्याने फलंदाजी जरा अजून बलवान होण्याची शक्यता आहे.

स्टार्ककडून रिव्हर्स स्विंगचा अभ्यास

कमिन्सची जागा मिचेल स्टार्क घेणार आहे जो वेगापेक्षा चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यावर भर देऊन भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. सरावादरम्यान स्टार्क प्रत्येक ऑस्ट्रेलियन फलंदाजाला रिव्हर्स स्विंग करून त्रास देताना दिसला. ऑस्ट्रेलियन फलंदाज सरावात विचारपूर्वक विविध फटके मारत होते. कोणीच फलंदाज फक्त स्वीपच्या फटक्यावर भर देत नव्हता. दर्जेदार भारतीय फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर खेळणे किती कठीण आहे, याचा अनुभव ऑसी फलंदाजांना आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com