

Saina Nehwal Retirement
Sakal
Saina Nehwal Retirement: भारतीय दिग्गज बॅटमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिने मोठा निर्णय घेतला आहे. तिने बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने निवृत्तीमागील कारणही सांगितले आहे. सायनाने सोशल मीडियावर पोस्ट न करता पॉडकास्टमध्ये सांगितले आहे.
सायनाने (Saina Nehwal) सांगितले की तिच्या गुडघ्यामध्ये असलेल्या वेदनेमुळे तिच्यासाठी आता खेळणे शक्य नाही. तिने शेवटची स्पर्धा २०२३ मध्ये सिंगापूर ओपन खेळली. सायनाने २०१२ मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले होते.