प्रकृती ठीक नसल्याने साईनाची स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई - साईना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील अपयश स्विस ओपनमधील स्पर्धेद्वारे विसरण्याचा प्रयत्न करणार होती, पण तिने पोटदुखीच्या त्रासामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

मुंबई - साईना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील अपयश स्विस ओपनमधील स्पर्धेद्वारे विसरण्याचा प्रयत्न करणार होती, पण तिने पोटदुखीच्या त्रासामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

स्वीस ओपन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध तितलिस शिखरावर महोत्सवी बॅडमिंटन लढत झाली. त्यात साईनाही सहभागी होणार होती, पण प्रकृती ठीक नसल्याने साईना सहभागी होणार नाही असे सांगण्यात आले. कश्‍यपने गेल्या आठवड्यापासून तिची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ती आली नसल्याचे सांगितले. या स्पर्धेत साईनाला तिसरे मानांकन होते. पुरुष एकेरीत भारताच्या शुभंकर डे याने विजयी सलामी दिली. त्याने फ्रान्सच्या लुकास क्‍लेअरबाऊट याचा २१-१९, २१-१७ असा पराभव केला. महिला एकेरीत वैष्णवी जक्का रेड्डी हिचे आव्हान संपुष्टात आले. इस्टोनियाच्या क्रिस्तिन कुबा हिने तिचा २१-१२, २१-२३, २१-९ असा पराभव केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saina Nehwal to be admitted to hospital after suffering from gastroenteritis