
भारताची फुलराणी, स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा घटस्फोट झाला. १३ जुलै रोजी तिनं पारुपल्ली कश्यप याच्यासोबत घटस्फोट झाल्याची घोषणा केली. इन्स्टाग्रामवर तिनं याबाबत पोस्ट केलीय. सायना आणि पारुपल्ली यांचं ७ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार ७ वर्षेच टिकला.