Indian Open: चर्चेतल्या सायनाचा दुसऱ्याच फेरीत पराभव | Saina Nehwal lost in Indian Open Second Round | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saina Nehwal lost in Indian Open Second Round
Indian Open: चर्चेतल्या सायनाचा दुसऱ्याच फेरीत पराभव

Indian Open: चर्चेतल्या सायनाचा दुसऱ्याच फेरीत पराभव

नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेचा विषय होती. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसंदर्भात ट्विट केले होते. त्याला अभिनेता सिद्धार्थने प्रत्युत्तर दिले. पण, सिद्धार्थच्या आक्षेपार्ह ट्विटवरून वाद झाला होता. दरम्यान, सायना नेहवाल इंडिया ओपनमध्ये (Indian Open 2022) खेळत होती. मात्र दुसऱ्या फेरीत तिचा पराभव झाला. (Saina Nehwal lost in Indian Open Second Round)

हेही वाचा: न्यूज अँकरची जोकोविचला 'ऑन कॅमेरा' शिवीगाळ

नवी दिल्लीच्या केडी जाधव हॉलमध्ये सुरु असलेल्या इंडिया ओपनच्या सामन्यात मालविका बनसोडने (Malvika Bansod) स्टार सायना नेहवालचा २१ - १७, २१ - ९ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. विशेष म्हणजे मालविकाने सायनाचा अवघ्या ३५ मिनिटात पराभव केला. सायना नेहवाल पहिल्या गेममध्ये ५ - ७ अशी पिछाडीवर पडली होती. मालविकाने पहिल्या गेममध्ये सायनाला पुनरागमनाची संधी न देता हा गेम २१ - १७ असा जिंकला.

पहिला गेम गमावल्यानंतर सायना बॅकफूटवर होती. याचा फायदा उचलत मालविका बनसोडने (Malvika Bansod) जोरदार खेळ करत दुसऱ्या गेममध्ये सायनाचा २१ - ९ असा धुव्वा उडवून दिला. बनसोडने सामना ३५ मिनिटात संपवला याचबरोबर सायनाचे स्पर्धेतील आव्हान देखील ३५ मिनिटात संपले.

हेही वाचा: RSA vs IND Live: रहाणे, पुजारा मोक्याच्या क्षणी पॅव्हेलियनमध्ये

सायनाच्या सामन्यापूर्वी भारताची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने (PV Sindhu) इरा शर्माचा २१ - १०, २१ - १० असा सहज पराभव करत तिसरी फेरी गाठली. सिंधूने पहिला गेम १३ मिनिटात खिशात घातला. त्यानंतर तिने आपला धडाका दुसऱ्या गेममध्येही कायम ठेवत सामना ३० मिनिटात संपवला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top