विराटवरुन आता मांजरेकर गावसकरांना अक्कल शिकवू लागला!

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

विश्वकरंडकाच्या उपांत्यफेरीत झालेल्या पराभवामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनाही कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे. मात्र, संजय मांजरेकरने आता गावसकरांच्याविरुद्ध जात विराटला समर्थन दर्शविले आहे. 

नवी दिल्ली : विश्वकरंडकाच्या उपांत्यफेरीत झालेल्या पराभवामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनाही कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे. मात्र, संजय मांजरेकरने आता गावसकरांच्याविरुद्ध जात विराटला समर्थन दर्शविले आहे. 

''गावसकरांच्या मताशी मी सहमत नाही. भारताने विश्वकरंडकात खराब कामगिरी केलेली नाही. भारताने सात सामने जिंकले आणि फक्त दोन सामन्यात पराभव झाला. शेवटच्या सामन्यात निसटता पराभव झाला,'' असे ट्विट मांजरेकरने केले आहे. 

गावसकर यांनी एका दैनिकातील स्तंभात म्हटले होते की, "संघाच्या कर्णधारपदी फेरनिवड करताना एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने नेहमीच्या प्रक्रियेला फाटा दिला. याविषयी मी समाधानी नाही. त्यांनी विराटच्या स्थानाची चर्चाच केली नाही. आपल्या सर्वांच्या कल्पनेनुसार विराटची नियुक्ती विश्‍वकरंडकापर्यंत होती. त्यानंतर फेरनियुक्ती करण्यापूर्वी सदस्यांनी पाच मिनिटांसाठी का होईना त्यांनी विराटबाबात बैठक घ्यायला हवी होती, पण आधी कर्णधार निवडण्यासाठी त्यांनी बैठक घेतलीच नाही.

यावरून विराट त्याच्या की निवड समितीच्या मर्जीनुसार कर्णधार आहे आहे असा प्रश्‍न निर्माण होतो. फेरनिवड झाल्यानंतर कर्णधाराला बैठकीसाठी आमंत्रित केले जाते आणि त्याची मते जाणून घेतली जातात. 'भारताला अंतिम फेरी गाठण्यात अपयश येऊनही विराटला मोकळीक देण्यात आली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sajay Manjrekar disagrees with Sunil Gavaskar on captaincy of Virat Kohli