साताऱ्यात रंगणार "सकाळ स्कूल क्रिकेट लीग'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

यंदा "एसएससीएल' स्पर्धेचे हे चौथे पर्व आहे. येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात (शाहू स्टेडियम) क्रीडाप्रेमींना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. 

सातारा : उंच षटकार... भेदक गोलंदाजी... जबरदस्त विकेट किपींग... हवेत झेप घेऊन घेतलेला झेल... "कमॉन कमॉन'चा "चिअरअप'...असे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे क्षण पुन्हा एकदा सातारकरांना अनुभवण्यास मिळणार आहेत. "एसपीसीएल'च्या धर्तीवर "सकाळ माध्यम समूहा'ने सुरू केलेली "सकाळ स्कूल क्रिकेट लीग (एसएससीएल)' यंदा 28 जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

"सकाळ'ने युवा क्रिकेटपटूंसाठी "सकाळ प्रिमियर क्रिकेट लीग (एसपीसीएल)'चे आयोजन केले होते. या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरावर चमकण्याची दारे खुली झाली.

हेही वाचा - बास्केटबॉल केवळ खेळ नव्हे जीवनशैली आहे : श्रुती भोसले

सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या स्पर्धेस नेहमीच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. कौतुक, अभिनंदनाचे षटकार, चौकारही मिळाले. तीच प्रेरणा घेऊन "सकाळ'ने लिटल मास्टर म्हणजेच शाळकरी मुलांना व्यावसायिक क्रिकेटचे "मैदान' उपलब्ध करून दिले. त्या माध्यमातून देखील अनेक चॅम्पियन्स घडल्याची उदाहरणे समस्त क्रीडाप्रेमींच्या समोर आहेत.

यंदा "एसएससीएल' स्पर्धेचे हे चौथे पर्व असून, येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात (शाहू स्टेडियम) क्रीडाप्रेमींना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. 
हेही वाचा -  आजही साता-यात घडताहेत उद्याचे बास्केटबॉलपटू

सातारा शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना "सकाळ'ने सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन' च्या सहकार्याने सकाळ स्कूल क्रिकेट लीगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने हे "लिटल मास्टर' नक्कीच करतील, असा विश्‍वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal School Cricket League 2020 Organised In Satara