साक्षी-धोनी सेलिब्रेशन मूड; छोटा माही लवकरच येणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakshi dhoni and MS Dhoni
साक्षी-धोनी सेलिब्रेशन मूड; छोटा माही लवकरच येणार?

साक्षी-धोनी सेलिब्रेशन मूड; छोटा माही लवकरच येणार?

Ranchi: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) याचा पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) सोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नुकताच साक्षीने 33 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनच्या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओत साक्षी केक कापताना दिसत आहे. धोनी तिच्या बाजूला उभे असल्याचे दिसते.

युएईत रंगलेली आयपीएल स्पर्धा आणि त्यानंतर 20 वर्ल्ड कपवेळी महेंद्रसिंह धोनी टीम इंडियासोबत होता. आता तो रांचीमध्ये असून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. शुक्रवारी धोनीची पत्नी साक्षीने 33 वा वाढदिवस साजरा केला. इंस्टाग्रामच्या माध्यमातून साक्षीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर साक्षी धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक जणांनी हटके अंदाजात साक्षीला शुभेच्छा दिल्या. एका युजर्सने तिला हॅप्पी बर्थडे क्वीन असं म्हटलं आहे. तर एकानं छोटा माही लवकरच येणार आहे वाटत? असं म्हणत साक्षी धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: Video : भुवीनं तोडली नीशमची बॅट; साउदी-बोल्ट झाले आवाक

2010 मध्ये धोनी आणि साक्षी यांचा विवाह सोहळा पार पडला होता. ही जोडी चांगलीच चर्चेत असते. धोनीपेक्षा त्याची पत्नी सोशल मीडियावर अधिक सक्रीय आहे. ती धोनीसह आपल्या लेकीचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. साक्षी अन् माहीला झिवा नावाची एक मुलगी आहे. त्यांच्या घरी नवा पाहुणा लवकरच येणार आहे. धोनीची पत्नी साक्षी प्रेग्नंट असल्याची चर्चा काही महिन्यांपासून रंगत होती. रैनाची पत्नी प्रियंका रैनाने या वृत्ताला दुजाराही दिला होता.

loading image
go to top