Video : भुवीनं तोडली नीशमची बॅट; साउदी-बोल्ट झाले आवाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind Vs Nz
Video : भुवीनं तोडली नीशमची बॅट; साउदी-बोल्ट झाले आवाक

Video : भुवीनं तोडली नीशमची बॅट; साउदी-बोल्ट झाले आवाक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना रांचीच्या मैदानात खेळवण्यात आला. हा सामना 7 विकेट्सने जिंकत भारतीय संघाने मालिका 2-0 अशी खिशात घातली. पहल्या सामन्यात दमदार गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या सामन्यातही आपल्यातील क्षमता सिद्ध करुन दाखवली. त्याने आपल्या वेगवान टाकलेल्या चेंडूवर जेम्स नीशमची बॅट तुटल्याचे पाहायला मिळाले.

न्यूझीलंडच्या डावातील 18 व्या षटकात भुवनेश्वर कुमार गोलंदाजीसाठी आला. 4 षटकांच्या कोट्यातील त्याची ही अखेरचे षटक होते. यावेळी जेम्स नीशम मैदानात खेळत होता. या षटकात जेम्स नीशमने त्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण यात काही त्याला यश मिळाले नाही. भुवीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना जेम्सच्या बॅटचा काही भाग तुटल्याचे पाहायला मिळाले. भुवीनं टाकलेल्या चेंडूवर घडलेला हा प्रकार पाहून डग आउटमध्ये बोल्ट आणि साउदीही आश्चचकित झाले. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने नीशमला बाद करत तंबूत धाडले. भुवीच्या गोलंदाजीवर नीशमची बॅट तुटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Syed Mushtaq Ali Trophy : हैदराबाद आउट; तामिळनाडूनं गाठली फायनल!

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत अनुभवी भुवनेश्वर कुमारला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. न्यूझीलंड विरुद्धच्या दोन सामन्यात त्याने पुन्हा एकदा कमबॅकचे संकेत दिले आहेत. पहिल्या सामन्यात भुवीनं 4 षटकात 24 धावा खर्च करुन दोन विकेट घेतल्या होत्या. यात डॅरेल मिशलचा उडवलेला बोल्ड हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

हेही वाचा: हिटमॅन म्हणाला, खेळाडूंना मैदानात स्वातंत्र्य मिळाला पाहिजे

पहिल्यांदा फलंदाजी करताना मार्टिन गप्टील आणि डॅरेल मिशेल या जोडीनं संघाच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी आक्रमक सुरुवात केली. पण मोठी धावसंख्या करण्यात दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. दोघांनी प्रत्येकी 31-31 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 34 धावा केल्या. न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 6 बाद 153 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या हर्षल पटेलनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर, अश्विन, अक्षर आणि दीपक चाहर यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. भारतीय संघाने 7 गडी राखून हे आव्हान पार करत सामन्यासह मालिका खिशात घातली.

loading image
go to top