Sakshi Malik : ब्रिजभूषणच्या गुंडांनी आईला धमकी दिली; साक्षी म्हणते तुम्हीही विसरू नका की तुमच्या घरात...

Sakshi Malik Brij Bhishan Sharan Singh
Sakshi Malik Brij Bhishan Sharan Singhesakal

Sakshi Malik Brij Bhishan Sharan Singh : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने आज (दि. 03) भारतीय कुस्ती परिषदेबद्दल अनेक वक्तव्य केली आहे. साक्षी मलिकने WFI चे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिज भूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. ब्रिज भूषण यांचे गुंड सक्रीय झाले असून त्यांनी माझ्या आईला धमकी दिल्याचा दावा साक्षीने केली आहे.

Sakshi Malik Brij Bhishan Sharan Singh
Sa Vs Ind 2nd Test Live : जयस्वाल पुन्हा अयशस्वी! रबाडाने दिला भारताला पहिला धक्का

साक्षी मलिक माध्यमांशी बोलताना म्हणाली की, 'गेल्या दोन तीन दिवसांपासून ब्रिजभूषण यांचे गुंड सक्रीय झाले आहे. माझ्या आईला धमकीवजा फोन केले जात आहेत. लोकं फोन करून सांगत आहेत की तुमच्या घरात कोणावर तरी गुन्हा दाखल होणार आहे. सोशल मीडियावर लोकं आम्हाला शिवीगाळ करत आहेत. मात्र त्यांनी देखील विसरून चालणार नाही की त्यांच्या घरात देखील बहीण - मुली आहेत.'

साक्षी मलिकने पत्रकारांना सांगितले की तिला नव्या समितीबाबत किंवा अॅड हॉक समितीबाबत कोणतीही तक्रार नाही. फक्त एक व्यक्ती संजय सिंहबाबत तक्रार आहे. संजय सिंह सोडून इतर सर्व समितीबाबत कोणतीही तक्रार नाही.'

'सरकार आमच्यासाठी पालकासारखं आहे. त्यांना मी विनंती करते की युवा कुस्तीपटूंसाठी कुस्ती सुरक्षित करा. संजय सिंहचे वागणे कसे आहे हे तुम्ही पाहिलं. त्याने कुस्ती परिषदेत ढवळाढवळ करू नये.'

Sakshi Malik Brij Bhishan Sharan Singh
Sa VS Ind : मियाँ का मॅजिक! सिराजसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या; 55 धावांवर खेळ खल्लास

साक्षी पुढे म्हणाली की, 'मी फक्त विनंती करू शकते की जर क्रीडा मंत्रालय सांगते की तो परत येणार नाही तर चांगलं आहे. सर्वांनी पाहिलं की WFI च्या निवडीनंतर ब्रिजभूषण सिंहने सत्तेचा दुरूपयोग कसा केला होता. त्याने कोणालाही न विचारता आपल्या शहरात ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप आयोजित करणार असल्याची घोषणा केली.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com