Sandeep Patil: क्रिकेटपटू संदीप पाटील रुग्णालयात; कारण आलं समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep Patil

Sandeep Patil: क्रिकेटपटू संदीप पाटील रुग्णालयात; कारण आलं समोर

भारताचे माजी धडाकेबाज फलंदाज आणि १९८३ च्या विश्वकरंडक विजेत्या संघातील खेळाडू संदीप पाटील यांच्यावर मंगळवारी अँजिओग्राफी करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.

६६ वर्षीय संदीप पाटील यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाजी पार्क येथे मूळ निवासस्थान असलेले संदीप पाटील सध्या अंधेरी (पूर्व) येथे राहत आहेत.

छातीत दुखू लागल्यामुळे त्यांचे मित्र डॉ. वैभव कसोदेकर यांनी त्यांना अंधेरीतील रुग्णालयात नेले. तेथे काढण्यात आलेला ईसीजी व्यवस्थित होता. त्यानंतर दक्षिण मुंबईतील रुग्णालयात आणल्यानंतर संदीप पाटील यांची सीटी अँजिओ चाचणी करण्यात आली. मंगळवारी डॉ. ए.बी. मेहता आणि डॉ. अजित देसाई यांनी अँजिओग्राफी केली. आता त्यानंतर पुढच्या उपचारांची दिशा ठरवण्यात येणार आहे.

हेही वाचा: IND vs BAN : करो या मरो! लढतीत 'या' दिग्गज खेळाडूंना मिळणार संधी

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर संदीप पाटील भारतीय संघाचे काही काळ प्रशिक्षक होते. केनिया संघालाही त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. ते निवड समितीचे अध्यक्षही राहिलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत ते अध्यक्षपदाचे उमेदवार होते. अमोल काळे यांनी त्यांचा पराभव केला होता.

हेही वाचा: IND vs BAN: कोणाला मिळणार संधी! लक्ष ऋषभ पंतवर...

१९८३ च्या विश्वविजेत्या संघातील यशपाल शर्माला आम्ही गतवर्षी गमावले. त्यानंतर कपिलदेव यांनाही हृदयविकाराचा झटका आला होता. आता मला हृदयाचा त्रास झाला आहे, परंतु काळजीचे कारण नाही. ६६ वर्षांच्या मशीनला आता सर्व्हिसिंगची गरज आहे, असे सांगत संदीप पाटील यांनी आपण व्यवस्थित आहोत असे याप्रसंगी कळवले आहे.

हेही वाचा: IND vs BAN 1st Test Day-1 LIVE: भारताने जिंकले नाणेफेक! जाणून घ्या संघांचे प्लेइंग-11

टॅग्स :Cricket