गोवा येथील अजिंक्यपद स्पर्धेत सांगलीच्या स्केटिंगपट्टूंचे यश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

गोवा स्केटिंग फेस्टीव्हल रोलर स्पोर्टस्‌ अजिंक्‍यपद
स्पर्धेत सांगलीच्या खेळाडूंनी विविध गटात यश मिळवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आठ लाख 90 हजार रूपयांची प्रायोजिकता मिळवली.

सांगली - गोवा स्केटिंग फेस्टीव्हल रोलर स्पोर्टस्‌ अजिंक्‍यपद
स्पर्धेत सांगलीच्या खेळाडूंनी विविध गटात यश मिळवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आठ लाख 90 हजार रूपयांची प्रायोजिकता मिळवली.

गोवा येथे अग्नेल आश्रममध्ये नुकतीच अजिंक्‍यपद स्पर्धा झाली. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील 650 खेळाडू सहभागी झाले होते. सांगली, मिरज, कुपवाड रोलर स्केटिंग असोसिएशन व सई स्केटिंग ऍकॅडमीचे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी विविध गटात यश मिळवले. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख, द्वितीय क्रमांकास 70 हजार आणि तृतीय क्रमांकास 50 हजार व चौथ्या, पाचव्या क्रमांकासाठी 30 हजार रूपयाची प्रायोजिकता क्‍लब महिंद्रातर्फे दिली गेली.

स्पर्धेतील विजेते खेळाडू मे 2019 मध्ये इंडोनेशिया येथे
होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील. प्रशिक्षक सूरज शिंदे, परवीन शिंदे, रोहिणी शिंदे यांचे मार्गदर्शन व प्रदीप घडशी आणि पालकांचे प्रोत्साहन मिळाले.

स्पर्धेतील सांगलीचे यशस्वी खेळाडू असे :

वेदीका घडशी, पलक प्रताप, रूग्वेधी ढेरे, विधी लोहिया (सुवर्णपदक), विक्रांत म्हेत्रे (रौप्य), सई शिंदे, दर्शन सुर्यवंशी, सईम पटेल, उत्प्रेक्षा नवलाई, रिदीत बगाडिया, सिदीक पटेल, आरूष दीक्षित, करण पवार, यश पाटगावकर, तनय झंवर, गौराज कांबळे, ओमकार कारंडे. या सर्व खेळाडूंनी 8 लाख 90 हजार रूपयाची प्रायोजिकता मिळवली. स्पर्धेत सांगलीच्या खेळाडूंनी द्वितीय स्थान मिळवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Skatingpattu victory in Goa Championship