Sania-Shoaib : 12 वर्षांचा संसार मोडला? सानिया-शोएबचा घटस्फोट फायनल, मित्राने केला मोठा खुलासा

सानिया आणि शोएबचा अधिकृतपणे घटस्फोट झाला...
Sania Mirza and Shoaib Malik
Sania Mirza and Shoaib Maliksakal
Updated on

Sania Mirza and Shoaib Malik : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचे लवकरच काडीमोड होणार आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये सातत्याने हा दावा केला जात आहे. पण या अफवांना बळ मिळाले आहे, या जोडप्याच्या जवळच्या मित्राने एक मोठे वक्तव्य केले आहे.

Sania Mirza and Shoaib Malik
IND vs ENG : पंत की कार्तिक, अक्षर की चहल? ही असले भारताची Playing-11

मीडिया रिपोर्ट्समध्ये सानिया-शोएबच्या जवळच्या मित्राकडून बातमी आली आहे की आता दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्यामध्ये सर्व काही फायनल झालं आहे. सध्या शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे. तो एका स्पोर्ट्स चॅनलसाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये काम करत आहे. तर सानिया मिर्झा दुबईत असल्याचे सांगण्यात आले आहे. सानियाने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यामुळे या अटकळांना आणखी हवा मिळाली आहे. शुक्रवारी सानिया मिर्झाने मुलगासोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आणि लिहिले, मला सर्वात कठीण दिवसांतून घेऊन जाणारे क्षण हे आहेत.

Sania Mirza and Shoaib Malik
IND vs END: ॲडलेडमध्ये काही तासात बदलले हवामान! उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस ?

त्याचवेळी दुस-या मीडिया रिपोर्टमध्ये शोएब मलिकच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या एका व्यक्तीचा हवाला देत घटस्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यक्तीने सांगितले की, सानिया आणि शोएबचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. दोघेही आता वेगळे झाले आहेत. शोएब मलिक दुसऱ्या मुलीला डेट करत असल्याचं पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. त्यामुळे त्याच्या आणि सानियाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतरच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. शोएबने त्याच्या एका टीव्ही शोमध्ये सानियाची फसवणूक केल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. मात्र, या वृत्तावर दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com