Sania Mirza-Shoaib Malik : 'या' एका कारणामुळे सानिया-शोएबचा घटस्फोट लांबतोय, चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sania Mirza-Shoaib Malik Divorced :

Sania Mirza-Shoaib Malik : 'या' एका कारणामुळे सानिया-शोएबचा घटस्फोट लांबतोय, चर्चांना उधाण

Sania Mirza-Shoaib Malik Divorced : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचे नाते सध्या खूप चर्चेत आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्याही येत आहेत. एवढेच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघेही वेगळे राहत आहेत. शोएब आणि सानियाच्या नात्याची दोन्ही देशांमध्ये म्हणजे भारत आणि पाकिस्तान मध्ये खुप चर्चा होत आहे. नातं तुटण्यावरून सर्व प्रकारच्या अटकळ बांधल्या जात आहेत. असे असूनही या जोडप्याने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दरम्यान पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दावा केला आहे की, त्यांच्या नात्याबाबत स्पष्टीकरण न देण्यामागे करोडो रुपयांचे नुकसान आहे.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

पाकिस्तानी वृत्तवाहिनी नुसार, दोघेही करार आणि कायदेशीर पैजेमुळे घटस्फोटावर स्पष्टीकरण देत नाहीत. खरंतर दोघांनीही अनेक शोजसोबत करार केला होता. दोघांना अजून बरेच कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचे आहेत. करोडो रुपयांचा हा सौदा आहे. वृत्तानुसार कायदेशीर समस्या सुटल्यानंतर दोघेही घटस्फोटाची घोषणा करणार आहेत.

हेही वाचा: Team India T20 WC : उपांत्य फेरीत पराभूत होऊनही टीम इंडिया मालामाल, मिळणार इतके कोटी

सानिया मिर्झाच्या एका पोस्टनंतर या जोडप्याच्या घटस्फोटावर बातमी सोशल मीडियावर पसरल्या. आठवड्याच्या सुरुवातीला सानियाने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की मनं आता तुटली आहेत ते सगळे कुठे जातात, यासगळ्यांच्या समस्यांवर अल्लाहच मदत करेल. असे सानियानं म्हटले आहे. सानिया आणि शोएब या दोघांनीही आपला मुलगा इझानला एकत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या घटस्फोटामागील कारण पाकिस्तानी अभिनेत्री आयशाने सांगितले जात आहे. शोएबची त्याच्याशी जवळीक वाढू लागली होती. दोघांनी गेल्या वर्षी एक हॉट फोटोशूटही केले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती.