आमचं नातं सॉलिड! मी 14 वर्षाची असताना रोहन... सानिया फायनमध्ये पोहचल्यानंतर भावूक | Australian Open Sania Mirza | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia Open Sania Mirza

Australian Open Sania Mirza : आमचं नातं सॉलिड! मी 14 वर्षाची असताना रोहन... सानिया फायनमध्ये पोहचल्यानंतर भावूक

Australia Open Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू आपला शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत आहे. तिने ग्रँडस्लॅमची सुरूवात ऑस्ट्रेलियान ओपन पासून केली होती. आता शेवटही ऑस्ट्रेलियन ओपनने करणार आहे. दरम्यान, आज सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या मिश्र दुहेरीतील भारतीय जोडीने अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे सानिया मिर्झाच्या ग्रँडस्लॅमचा प्रवास विजेतेपदाने संपण्याची आशा वाढली आहे.

हेही वाचा: Renuka Singh : भारतीय महिला क्रिकेटमधील उगवत्या ताऱ्याला ICC नं केला सलाम

सानिया आणि रोहन या जोडीने डेझरे क्रॉचेक आणि नेअल स्कप्स्की या जोडीचा 7-6(5), 6-5(5), 10-6 असा पराभव केला. 36 वर्षाच्या सानिया मिर्झा आणि 42 वर्षाच्या रोहन बोपन्ना यांनी तब्बल 1 तास 52 मिनिटे कडवी झुंज देत विजय खेचून आणला. दोन्ही जोड्यांनी प्रत्येकी एक एक सेट जिंकल्यामुळे सामना सुपर टाय ब्रेकरवर गेला. त्यात सानिया आणि रोहनने आपला अनुभव पणाला लावला आणि अंतिम फेरी गाठली.

सानियाने सामना झाल्यानंतर भावनिक होत प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, 'ही खूप जबरदस्त मॅच झाली. खूप उत्कंठावर्धक सामना होता. ही माझी शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि ती स्पर्धा रोहन बोपन्नाबरोबर खेळणे खूप खास आहे. मी ज्यावेळी 14 वर्षाची होते त्यावेळी रोहन बोपन्ना हा माझा पहिला मिश्र दुहेरीचा जोडीदार होता. आज मी 36 वर्षांची आहे आणि रोहन 42 वर्षांचा आहे आणि आम्ही दोघे अजून खेळतोय. आमचं नातं सॉलिड आहे.'

हेही वाचा: Suryakumar Yadav: जिंकलंस भावा! ICC ने सूर्याच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

सानिया मिर्झा इंग्लंड आणि अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंबद्दल म्हणाली की, 'आम्ही या कोर्टवर उतरण्यात उत्सुक आहोत. आमच्यासाठी ही शेवटची संधी असले. आम्ही या स्पर्धेतील सर्वोत्तम मिश्र दुहेरी जोडीविरूद्ध खेलणार आहोत. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू.' सानिया मिर्झाने आपले पहिले ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन 2009 मध्ये जिंकले होते. त्यावेळी तिचा मिश्र दुहेरीचा जोडीदार हा महेश भुपती होता.

(Sports Latest News)

हेही वाचा : 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?