esakal | "ममा' बनल्यावर सानियाचे लक्ष्य- टोकियो 2020!
sakal

बोलून बातमी शोधा

sania mirza eyeing on 2020 tokyo

भारताची दुहेरीतील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा लवकर "ममा' बनणार आहे. तिने टोकियोला 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने पुनरागमन करून "सुपरमॉम' बनण्याचे तिचे लक्ष्य आहे. 

"ममा' बनल्यावर सानियाचे लक्ष्य- टोकियो 2020!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैदराबाद - भारताची दुहेरीतील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा लवकर "ममा' बनणार आहे. तिने टोकियोला 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने पुनरागमन करून "सुपरमॉम' बनण्याचे तिचे लक्ष्य आहे. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 31 वर्षीय सानिया म्हणाली, की पुनरागमन करताना क्रमवारीच्या नियमांचा पर्याय माझ्यासमोर असेल. काही स्पर्धांत मी पूर्वीच्या क्रमांकानुसार खेळू शकेन. पूर्वी मी असे केले आहे. आपण अजून 2018 मध्ये आहोत. आणखी बराच काळ बाकी आहे. 

कारकिर्दीत दुहेरीत सहा ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविलेल्या सानियाने किम क्‍लायस्टर्स आणि सेरेना विल्यम्स यांचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख केला. "टूर'वर किमान 20 "सुपरमॉम' खेळत आहेत. सेरेना आपली सर्वांत महान टेनिसपटू आहे, पण तिलासुद्धा पुनरागमन सोपे गेले नाही. एक-दीड वर्षे खेळापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा आधीच्याच दर्जाचा खेळ करणे सोपे नसते, असे सानिया म्हणाली. 

सानियाने आई-वडिलांचा आवर्जून उल्लेख केला. ती म्हणाली, ""मी नेहमीच्या स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगत आले आहे. मी पारंपरिक स्त्रीसारखे जगले नाही. जेव्हा फार कुणी टेनिस खेळण्याचे, विंबल्डन जिंकण्याचे स्वप्न पाहत नव्हते तेव्हा हैदराबादमध्ये मी खेळू लागले. ज्याच्यावर प्रेम होते त्याच्याशी मी लग्न केले. लग्नानंतर आठ वर्षांनी मी आई बनण्याचे ठरविले. पालकांनी माझ्या निर्णयांना नेहमीच पाठिंबा दिला.'' 

माझे अपत्य आत्मविश्‍वासाने भारलेले, स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र असायला हवे. अपत्यास माझे सर्वोच्च प्राधान्य राहील, पण म्हणून दिवसातील प्रत्येक मिनिट मी त्याच्याबरोबरच राहायला हवे असे नाही. मी आणि पती शोएब मलिक दोघे क्रीडापटू आहोत. त्यामुळे येणाऱ्या दडपणाची आम्हाला कल्पना आहे. काही वेळा आम्ही दोघे सामने खेळत असतो. एखादा दिवस त्याला चांगला जातो, तर मला वाईट. अशा वेळी मी त्याच्या कामगिरीविषयी आनंदी असले पाहिजे, पण स्वतःबद्दल मी फार वाईट वाटून घेता कामा नये. खेळाने आम्हाला विजय-पराभवाला सामोरे जाण्यास आणि सावरून उसळी घेण्यास शिकविले आहे. 
- सानिया मिर्झा 

loading image