
Sania Mirza : सानिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेलं पत्र शेअर करत म्हणाली; मी देशासाठी खेळताना...
PM Narendra Modi Letter To Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने गेल्या महिन्यात आपली व्यावसायिक टेनिस कारकीर्द संपुष्टात आणली. सानिया मिर्झाने आपल्या जवळपास 20 वर्षाची दैदिप्यमान कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतली. यानंतर आता सानिया मिर्झा आरसीबीच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल झाली असून ती भारतातील युवा महिला क्रिकेटपटूंना तिच्या अनुभवाची शिदोरी देत आहे.
दम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झाला तिच्या निवृत्तीनंतर एक पत्र लिहिले. या पत्रात नरेंद्र मोदी सानिया मिर्झाला चॅम्पियन म्हणत तिने भारतीय क्रीडा विश्वावर तिची छाप सोडल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी सानिया मिर्झा ही येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांच्या पत्रानंतर सानिया मिर्झाने ट्विट केले. ती म्हणाली, 'मी पंतप्रधानांच्या प्रेरणा देणाऱ्या शब्दांसाठी त्यांचे आभार मानते. मी कायम गर्वाने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. मी कामय माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. इथून पुढेही देशाला गौरव मिळवून देण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी मनापासून आभार.'
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण