IND vs PAK: जडेजाला प्रश्न विचारून पुन्हा चर्चेत आले मांजरेकर, ३ वर्षांपूर्वी झाला होता वाद Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Manjrekar On Ravindra Jadeja

IND vs PAK: जडेजाला प्रश्न विचारून पुन्हा चर्चेत आले मांजरेकर, ३ वर्षांपूर्वी झाला होता वाद Video

Sanjay Manjrekar On Ravindra Jadeja Ind vs Pak Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ दुबईच्या मैदानावर आमनेसामने आले होते. भारताने हा सामना 5 विकेटने जिंकला. रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांच्यातील शब्दयुद्ध कोणापासून लपलेले नाही. 2019 च्या विश्वचषकादरम्यान माजी भारतीय खेळाडूने जडेजाला 'बिट्स अँड पीस प्लेयर' असे संबोधले तेव्हा त्याची सुरुवात झाली. या वक्तव्यानंतर जडेजाने मांजरेकरांना फटकारले आणि त्यांच्या कामगिरीने सडेतोड उत्तरही दिले. रविवारी जेव्हा हे दोन खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये भेटले तेव्हा जडेजा आणि मांजरेकर ही जोडी चर्चेत आली.

हेही वाचा: IND vs PAK : टीम इंडियाच्या विजयात शरद पवार नंतर PM मोदीही सामील केले अभिनंदन

मॅचनंतरच्या प्रजेंटेशनदरम्यान मांजरेकरने जडेजाला पहिला प्रश्न विचारला, 'तुम मुझसे बात करने में OK हो'? जडेजाने हसत उत्तर दिले आणि हो म्हणाला... मला काही अडचण नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 2019 वर्ल्डमध्ये जडेजावर एक वक्तव्य देताना मांजरेकर म्हणाले की, मी 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये जडेजा असलेल्या 'बिट्स अँड पीस प्लेयर' खेळाडूंचा मोठा चाहता नाही. कसोटी सामन्यांमध्ये तो फक्त एक गोलंदाज असतो, पण 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये माझ्याकडे एक फलंदाज आणि एक स्पिनर असायला हवा. याला उत्तर देताना जडेजा म्हणाला होता, मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे आणि अजूनही खेळत आहे. ज्यांनी काही साध्य केले त्यांचा आदर करायला शिका.

हेही वाचा: Sharad Pawar : पाकिस्तानच्या पराभवानंतर शरद पवारांचा जल्लोष, Video होतोय व्हायरल

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला 19.5 षटकात 147 धावांवर बाद केले आणि त्यानंतर 19.4 षटकात 5 विकेट्स घेत लक्ष्य गाठले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने चार, हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले, तर फलंदाजीत विराट कोहली (35), रवींद्र जडेजा (35) आणि हार्दिक पांड्या (33) यांनी शानदार खेळी केली. पंड्याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Web Title: Sanjay Manjrekar Again Limelight After Asking Question To Ravindra Jadeja Ind Vs Pak Asia Cup 2022 Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..