Sanju Samson : अखेर 40 सामन्यानंतर तो योग आला; संजूचं शतक केरळसाठी का आहे खास?

Sanju Samson
Sanju Samsonesakal
Updated on

Sanju Samson : भारताचा सोशल मीडियावर सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटपटू संजू सॅमसनने अखेर आठ वर्षाचा आपला दुष्काळ संपवला आहे. त्याने तब्बल 40 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर शतकी खेळी केली आहे. 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या संजूला आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकी खेळीसाठी तब्बल 8 वर्षे वाट पहावी लागली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची अवस्था 2 बाद 49 धावाा अशी झाली होती त्यावेळी त्याने आधी केएल राहुलसोबत 52 तर तिलक वर्मासोबत 116 धावांची भागीदारी रचली. त्याने 114 चेंडूत 108 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे संजू सॅमसन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर शतक ठोकणारा केरळचा पहिला खेळाडू ठरला आहे.

Sanju Samson
SA vs IND 3rd ODI Live : टोनी डी जार्जीचे दमदार अर्धशतक; आफ्रेकेचीही कडवी फाईट

संजू सॅमसनची भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी हुकली होती. त्याने अनेक सामन्यात चांगली कामगिरी करून देखील त्याची वर्णी वनडे संघात लागली नव्हती. वनडे वर्ल्डकपदरम्यान संजूला टी 20 संघात सातत्याने खेळवण्यात आले. आता टी 20 वर्ल्डकपच्या संघाची तयारी सुरू असताना संजूला टी20 ऐवजी वनडे संघात स्थान मिळालं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने दोन खेळाडूंबरोबर महत्वाची भागीदारी रचली. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर संजूने केएल राहुलसोबत 52 धावांची भागीदारी रचत संघाला सावरलं. राहुल 21 धावा करून बाद झाल्यानंतर त्याने तिलक वर्माच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला.

Sanju Samson
KL Rahul : धोनीनंतर केएलच! जे ऋषभ पंतला जमलं नाही ते राहुलनं करून दाखवलं

तिलक वर्मासोबत संजूने 116 धावांची शतकी भागीदारी रचली. तिलकची सुरूवात संथ झाली होती. मात्र त्याने नंतर आक्रमक फलंदाजी करत 77 चेंडूत 52 धावा केल्या. 246 धावा झाल्या असताना संजू बाद झाला. त्यानंतर रिंकू सिंह आणि वॉशिंग्टन सुंदरने भारताला 277 धावांपर्यंत पोहचवले. सुंदर 14 धावा करून बाद झाल्यानंतर रिंकूने भारताला 300 जवळपास पोहचवले. त्याने 27 चेंडूत 38 धावा केल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.