पुनरागमनानंतर पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा पुन्हा संघाबाहेर

वृत्तसंस्था
सोमवार, 13 जानेवारी 2020

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर.

मुंबई : सुमारे पाच वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या संजू सॅमसनला पुन्हा एकदा भारतीय संघातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सॅमसनने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आपली दावेदारी मजबूत केली होती. पण, त्याला अचानक संघातून वगळण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची रविवारी रात्री निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माचा सलामीला साथीदार शिखर धवन की केएल राहुल हा वाद राष्ट्रीय निवड समितीने न सोडवणेच पसंत केले. निवड समितीने तीन सलामीवीरांना निवडले आहे. न्यूझीलंडमधील तीन एकदिवसीय लढती तसेच पाच ट्‌वेंटी 20 सामन्यांसाठी रविवारी निवड करणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात केवळ ट्‌वेंटी 20 मालिकेसाठीच संघ रविवारी रात्री जाहीर करण्यात आला.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील संघात फारसा बदल करण्यात आला नाही. अतिरिक्त यष्टिरक्षक संजू सॅमसन याच्याऐवजी सलामीवीर रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. ही निवड करताना रिषभ पंतवर पूर्ण विश्‍वास दाखवण्यात आला. मात्र, संजू सॅमसनला वगळण्यात आल्याने निवड समितीवर टीका होत आहे. सॅमसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. वॉशिंग्टन सुंदरला संघात कायम ठेवले आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanju Samson not include in team for new zealand tour of india 2020