Sanju Samson Vs Suryakumar Yadav : सूर्या की संजू... वर्ल्डकपची लॉटरी कोणाला लागणार, निर्णय उद्या होणार?

Sanju Samson Vs Suryakumar Yadav
Sanju Samson Vs Suryakumar Yadav esakal

Sanju Samson Vs Suryakumar Yadav : भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. मात्र अजून भारतीय संघाचे कॉम्बिनेशन सेट झालेले नाही. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी विंडीज दौऱ्यावरली वनडे मालिकेत आम्ही संघाबाबत प्रयोग करू असे सांगितल्याने या गोष्टीला दुजोरा मिळत आहे.

भारतीय वनडे संघात मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला संधी द्यायची की संजू सॅमसनला याचा निर्णय अजून झालेला नाही. या दोघांपैकी कोणाच्या नावर शिक्कामोर्तब करायचं हे बहुदा वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात निश्चित होईल.

अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवडसमिती लवकरच भारताच्या वर्ल्डकप 2023 साठीच्या संघाला अंतिम स्वरूप देतील. याच संजू विरूद्ध स्काय ही प्रमुख लढत असणार आहे. (ICC ODI World Cup 2023 Team India Squad)

Sanju Samson Vs Suryakumar Yadav
Yuvraj Singh Stuart Broad : दरारा निर्माण करणाऱ्या... युवराजची निवृत्त होणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडसाठी खास पोस्ट

भारतीय वर्ल्डकप संघत मधल्या फळीसाठी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती असतील. मात्र हे दोघेही सध्या एनसीएमध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी घाम गाळत आहेत. त्यांच्या फिटनेसच्या प्रगतीवर सगळं अवलंबून आहे. दोघांचीही नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांनी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव देखील सुरू केला आहे.

या दोघांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीसाठी संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादववर विश्वास दर्शवला. तो टी 20 मधील एक उत्तम फलंदाज आहे. मात्र वनडे क्रिकेटमध्ये त्याला त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. (Suryakumar Yadav Vs Sanju Samson)

स्कायने गेल्या 12 महिन्यात वनडे सामन्यात 13.60 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या तुलनेत संजू सॅमसनची सरासरी दमदार आहे. त्याने 73.66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

मात्र असे असले तरी सूर्यकुमार यादववर रोहित आणि राहुल द्रविडने विश्वास दर्शवला असून त्यांनी सूर्याचे ट्रॅक रेकॉर्ड माहिती असून त्यालाच पाठिंबा दिला आहे.

Sanju Samson Vs Suryakumar Yadav
Nicholas Pooran MI MLC 2023 : 40 चेंडूत शतक, पूरन पुरून उरला! देशाला सोडलंय वाऱ्यावर MI साठी मात्र करतोय जिवाचं रान

राहुल द्रविड दुसऱ्या वनडे सामन्यानंतर म्हणाला की, 'सूर्यकुमार यादव हा खरंच एक चांगला खेळाडू आहे यात शंका नाही. त्याची कामगिरी ते सिद्ध करते. मात्र दुर्दैवाने वनडेमध्ये त्याला त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही हे देखील तितकंच खरं आहे.'

द्रविड पुढे म्हणाला, 'तो देखील वनडे क्रिकेटशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो एक उत्तम दर्जाचा फलंदाज आहे. आम्ही त्याला जितकी संधी देता येणे शक्य आहे तितकी संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी या संधीचं सोनं करायचं की नाही हे त्याच्याच हातात आहे.'

दुसरीकडे संजू सॅमसनला वेस्ट इंडीज विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र त्याला याचा फायदा उचलता आला नाही. त्याला तिसऱ्या वनडे सामन्यात संधी मिळणार की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. त्याला त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अजून एक संधी मिळेल अशी शक्यता आहे.

गेल्या वर्षी वेस्ट इंडीजमध्येच त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला नवसंजिवनी दिली होती. वर्ल्डकप 2023 च्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संजू सॅमसनला त्याची गेल्या 12 महिन्यातील वनडेतील कामगिरी फायदेशीर ठरू शकते.

दुसऱ्या बाजूला केएल राहुल (KL Rahul) जवळपास फिट झाला असून तो संघात परतण्यासाठी सज्ज आहे. इशान किशनने पाठोपाठ दोन अर्धशतकी खेळी करत वर्ल्डकपच्या संघातील विकेटकिपर म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.

त्यामुळे आता फक्त सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांच्यात फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी चुसर आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com