Nicholas Pooran MI MLC 2023 : 40 चेंडूत शतक, पूरन पुरून उरला! देशाला सोडलंय वाऱ्यावर MI साठी मात्र करतोय जिवाचं रान

Nicholas Pooran MI  MLC 2023
Nicholas Pooran MI MLC 2023ESAKAL

Nicholas Pooran MI MLC 2023 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वनडे मालिकेत विंडीजचे अनेक स्टार खेळाडू जे आयपीएलमध्ये दमदार कागमगिरी करत आहेत ते दिसत नाहीयेत. या स्टार खेळाडूंनी देशाच्या संघाऐवजी फ्रेंचायजीच्या संघाला जास्त महत्व दिलं आहे. असाच एक खेळाडू म्हणजे निकोलस पूरन! (Major League Cricket 2023 Final)

विंडीजचा हा डावखुरा फलंदाज सध्या मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क कडून मेजर लीग क्रिकेटमध्ये आपला दम दाखवत आहे. सोमवारी 31 जुलैला झालेल्या मेजर लीग क्रिकेट फायनलमध्ये निकोलस पूरनने (Nicholas Pooran) 40 चेंडू शतकी खेळी करत मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कच्या विजयात मोठा वाटा उचलला. मुंबई इंडियन्सने सिएटल ऑरकसचा पराभव केला. (MI New York Defeat Seattle Orcas)

Nicholas Pooran MI  MLC 2023
Venkatesh Prasad WI Vs IND : पैसा अन् पॉवर आहे मात्र... प्रसादने विंडीजविरूद्ध 'सराव' करणाऱ्या टीम इंडियाचे कान उपटले

पूरनची नाबाद शतकी खेळी

मेजर लीग क्रिकेट स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात एमआय न्यूयॉर्कने सिएटल ऑरकासचा पराभव करत पहिल्या वहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. विंडीजच्याच निकोलस पूरनने 55 चेंडूत नाबाद 137 धावांची तुफानी खेळी केली. त्याने या खेळीत तब्बल 13 षटकार आणि 14 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट हा 249 इतका होता.

निकोलस पूरनच्या या खेळीच्या जोरावर एमआय न्यूयॉर्कने 16 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यातच सिएटलचे 184 धावांचे आव्हान पार करत ट्रॉफीवर आपले नाव करले. सिएटलकडून इमाद वसिम आणि क्रणधार वेन पार्नेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Nicholas Pooran MI  MLC 2023
Rahul Dravid : आशियाई व विश्‍वकरंडकासाठी संघात प्रयोग कायम राहणार

पोलार्डच्या अनुपस्थितीत पूरन झाला कर्णधार

विंडीजचा माजी खेळाडू किरॉन पोलार्डच्या अनुपस्थितीत निकोलस पूरनने एमआय न्यूयॉर्कच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. त्याने कॅप्टन्स इनिंग खेळत विजयात मोलाचा वाटा उचलला.

एमआय न्यूयॉर्कचा पूर्णवेळ कर्णधार किरॉन पोलार्ड दुखापतीने ग्रस्त आहे. तो दुखापतीमुळे एलिमिनेटर सामन्यांमध्ये वॉशिंग्टन फ्रिडम आणि चॅलेंजर सामन्यात टेक्सास सुपर किंग्जविरूद्ध देखील खेळू शकला नव्हता.

बहुतांश संघाचे मालक भारतीय वंशाचे

मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. यात लॉस एंजेलिस नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिंस्को युनिकॉर्न, सिएटल ऑरकास, टेक्सास सुपर किंग्ज आणि वॉशिंग्टन फ्रीडम या संघाचा समावेश आहे.

या संघातील बहुतांश संघ मालक हे भारतीय वंशाचे आहेत. याचबरोबर आयपीएलमधील बऱ्याच फ्रंचायजींनी या लीगमधील संघ देखील खरेदी केले आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com