सारा तेंडुलकर, शुभमन गिलने शेअर केले बीच फोटो; काय आहे भानगड? | Sara Tendulkar Shubman Gill beach Instagram story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Tendulkar Shubman Gill Relationship
सारा तेंडुलकर, शुभमन गिलने शेअर केले बीच फोटो; काय आहे भानगड?

सारा तेंडुलकर, शुभमन गिलने शेअर केले बीच फोटो; काय आहे भानगड?

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र अधून मधून त्यांच्याबाबतचे फोटो, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत असतात. (Sara Tendulkar Shubman Gill Relationship)

नुकतेच या दोघांनी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. योगायोगाने शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमधील फोटोत बीच हा कॉमन फॅक्टर आहे. सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar Instagram Post) शेअर केलेल्या फोटोत ती एका कारमध्ये बसली आहे. त्या कारच्या मिररमध्ये साराचा चेहरा दिसत आहे. तर दुसरीकडे गिल एका बीचवर बसलेला दिसत आहे. गिलने (Shubman Gill Instagram Post) अजून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो एका बीच रिसॉर्टवरमध्ये बसला आहे. तर दुसऱ्या फोटोत तो खूष दिसत आहे. या फोटोला त्याने माझा नवीव वर्षाचा मूड असे कॅप्शन दिले.

सारा आणि शुभमन गिलमध्ये एकच कॉमन गोष्ट 'बीच'

सारा आणि शुभमन गिलमध्ये एकच कॉमन गोष्ट 'बीच'

हेही वाचा: जोकोविच सरकारच्या ताब्यात; सर्बिया-ऑस्ट्रेलियामध्ये जुंपली

काही दिवसांपूर्वी शुभमन गिल आणि वरुण धवनची भाची अंजनी धवनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर दोघेही डिनर डेटवर गेल्याची चर्चा सुरु झाली होती. सारा तेंडुलकर काही दिवसांपूर्वी लंडनमधून मुंबईत परतली होती. तिला विमानतळावर पाहण्यात आले होते.

सारा तेंडुलकरने मॉडेलिंगच्या (Sara Tendulkar Modeling) जगतात पाऊल ठेवले आहे. तिची एका कपड्याच्या ब्रँडसाठीची जाहीरात मध्यंतरी खूप व्हायरल झाली होती. सारा तेंडुलकर इन्स्टाग्रामवर फार थोड्या क्रिकेटपटूंना फॉलो करते. यात शुभमन गिल देखील आहे. सारा शुभमन गिल बरोबरच शुभमनची बहीण शाहनील गिलला (Shubman Gill Sister) देखील इन्स्टावर फॉलो करते. मात्र अजून पर्यंत या दोघांमध्ये काय नाते आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top