जोकोविच सरकारच्या ताब्यात; सर्बिया - ऑस्ट्रेलियामध्ये जुंपली | Novak Djokovic Detained In Australia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic Detained In Australia
जोकोविच सरकारच्या ताब्यात; सर्बिया - ऑस्ट्रेलियामध्ये जुंपली

जोकोविच सरकारच्या ताब्यात; सर्बिया-ऑस्ट्रेलियामध्ये जुंपली

मेलबर्न : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणारा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियात (Australia) प्रवेश नाकारण्यात आला आहे. तो ऑस्ट्रेलिया ओपन खेळण्यासाठी मेलबर्न येथे दाखल झाला होता. मात्र त्याने कोरोना लस न घेतल्याने त्याला ऑस्ट्रेलियात रोखण्यात आले आहे. तो ऑस्ट्रेलिया ओपन (Australia Open) खेळण्यासाठी मेलबर्नमध्ये दाखल झाला होता. (Novak Djokovic Detained In Australia)

जोकेविचच्या वडिलांनी (Novak Djokovic Father) सर्बियामधील माध्यमांना सांगितले की, त्यांच्या मुलाला मेलबर्नमधील विमानतळावर दाखल होताच एका विलगीकरण कक्षात पोलिसांच्या पहाऱ्यात ठेवण्यात आले आहे. तो दुबईवरून १४ तासाचा विमान प्रवास करुन मेलबर्न विमानतळावर दाखल झाला होता.

हेही वाचा: कपिल देव यांनी पाकिस्तानी फलंदाजांचे 'हेल्मेट वाजवून' केलं होतं पदार्पण

जोकोविचला ताब्यात घेऊन विलगीकरण हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. जोकोविचला मायदेशी परत पाठवायचे का नाही याबाबतचा निर्णय आता सोमवारी न्यायालयात होणार आहे. तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियात थाबण्यास परवानगी मिळाली आहे.

मात्र या जोकोविचला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्यावरून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (Australia Prime Minister) आणि सर्बियाचे अध्यक्ष (Serbia President) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सर्बियाचे अध्यक्षांनी दावा केला की आमच्या देशाचा सर्वात प्रसिद्ध खेळाडूचा ऑस्ट्रेलियात छळ झाला आहे. (Australia Serbia Political War Over Novak Djokovic Vaccine Raw)

हेही वाचा: RSA vs IND Live: अटीतटीच्या सामन्यात पावसाचा खोडा

सर्बियाचे अध्यक्ष व्हुसिस (Serbia President Aleksandar Vucic) यांनी ट्विट करुन सांगितले की 'ते जोकेविचशी बोलले आहेत. त्याला संपूर्ण सर्बिया तुझ्या पाठीशी आहे. आमच्या संस्था जगातील सर्वात मोठ्या टेनिस खेळाडूचा कसा छळ केला जात आहे हे जगापर्यंत पोहचवण्यासाठी आणि तो रोखण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत.'

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australia Prime Minister Scott Morrison) यांनी माध्यमांना सांगितले की, 'नियम म्हणजे नियम विशेष सूट कोणालाही मिळणार नाही. महामारीच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या सीमा सुरक्षित करण्याबाबत आम्ही योग्य निर्णय घेणे सुरुच ठेवणार आहोत.'

हेही वाचा: Womens World Cup: भारतीय संघाची घोषणा, सलामीलाच पाकिस्तानशी भिडणार

नोव्हाक जोकोविचनेआपण कोरोना लस घेतली आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती उघड केली नव्हती. दरम्यान, त्याने लसीच्या सक्तीवर टीका देखील केली होती. गुरुवारी त्याने इन्स्टाग्राम (Novak Djokovic Instagram) अकाऊंवरुन आपल्याली रेकॉर्ड ब्रेक २१ व्या ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी त्याला विशेष वैद्यकीय सूट मिळाल्याचा दावा केला होता. या दाव्यामुळे ऑस्ट्रेलियात रणकंदन माजले. मेलबर्नमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठा लॉकडाऊन (Longest Lock down) लावण्यात आला होता. मेलबर्नमध्येच ऑस्ट्रेलिया ओपनचे (Australia Open) आयोजन केले जाणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top