esakal | पराभव भोवला; सर्फराज आता एकाच प्रकारात कर्णधार
sakal

बोलून बातमी शोधा

पराभव भोवला; सर्फराज आता एकाच प्रकारात कर्णधार

विश्वकरंडकात पाकिस्तानच्या संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नसल्याने आता पाकिस्तानमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक बदलाचे वारे वाहू लागले आहे. प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा कार्यकाळ संपल्याने आता नवेलप्रशिक्षक नेमले जाणार आहेत. 

पराभव भोवला; सर्फराज आता एकाच प्रकारात कर्णधार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद : विश्वकरंडकात पाकिस्तानच्या संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नसल्याने आता पाकिस्तानमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक बदलाचे वारे वाहू लागले आहे. प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा कार्यकाळ संपल्याने आता नवेलप्रशिक्षक नेमले जाणार आहेत. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची 29 जुलैला सभा होण्याची शक्यता आहे. मिकी आर्थर यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनाही आता नव्याने अर्ज करायला लागणार आहे असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. त्यांचा करार वाढविण्यास नकार दिला आहे. 

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवरील कर्णधारपदाची जबाबदारीसुद्धा कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याच्याकडून कदाचित सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून नेतृत्वाची धूरा काढून घेतली जाण्याची शक्यता आहे.