साथियानचा तिसऱ्या फेरीत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साथियानचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

साथियानचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ह्युस्टन : येथे सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जी. साथियानने रशियाच्या व्लादिमीर सिदोरेन्कोवर ४-० असा विजय मिळवून पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत आगेकूच केली.

जागतिक क्रमवारीत ३७ व्या स्थानी असलेल्या जी साथियानने १७९ व्या क्रमांकाच्या व्लादिमीरचा ११-९, ११-९, ११-८, ११-६ असा पराभव केला. तिसऱ्या फेरीत जी. साथियानसमोर जागतिक क्रमवारीत १७९ व्या क्रमांकावर असलेल्या नायजेरियाच्या अरुणा क्वाद्रिचे आव्हान असेल.

भारताचा अव्वल मानांकित खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या शरथ कमलला मंगळवारी सुरुवातीच्या एकेरी गटाच्या फेरीत निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. तथापि, शरथ कमलला अजूनही पुरुष दुहेरीत जी. साथियानसह आणि मिश्र दुहेरीत अर्चना कामतसह प्रभाव पाडण्याची संधी आहे.

शरथ कमल आणि अर्चना कामत यांनी अल्जेरियाच्या सामी खेरौफ आणि कटिया केसासी यांच्यावर ३-० असा विजय मिळवत अंतिम ३२ च्या फेरीत प्रवेश केला आहे.

loading image
go to top