टीकाकारांना उत्तर दिल्याचे समाधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

आशियाई स्पर्धेचे आव्हान वेगळेच असते. त्यामुळे अमूक एक खेळाडू पदक मिळविलेच असे छातीठोकपणे सांगता येणे कठीण आहे. अर्थात, ऍथलेटिक्‍समधील यशात मुलींचा वाटा अधिक असेल यात शंका नाही. अंदाज व्यक्त करायचा झाला, तर आठ ते दहा पदके मिळतील असे वाटते.

आशियाई स्पर्धेचे आव्हान वेगळेच असते. त्यामुळे अमूक एक खेळाडू पदक मिळविलेच असे छातीठोकपणे सांगता येणे कठीण आहे. अर्थात, ऍथलेटिक्‍समधील यशात मुलींचा वाटा अधिक असेल यात शंका नाही. अंदाज व्यक्त करायचा झाला, तर आठ ते दहा पदके मिळतील असे वाटते. यातही हिमा दास, सीमा पूनीया यांना मी प्राधान्य देईन. हिमाला सुवर्णपदकासाठी बहारिनच्या सल्वा नासेर, अमिनत जमाल आणि भारताचीच निर्मला यांचे कडवे आव्हान राहील. त्यामुळे हिमाला सुवर्णपदकासाठी वैयक्तिक कामगिरी उंचवावी लागेल. 4 बाय 400 रिले शर्यतीतही भारताला सुवर्णपदकासाठी संघर्ष करावा लागेल. पंधराशे मीटर रिले शर्यतीत पी. यू. चित्राला नामी संधी आहे. संजीवनी जाधवसमोरही लांब पल्ल्याच्या शर्यतीत जपानचे आव्हान असेल. सुधालाही पदकाचा रंग बदलण्यासाठी स्वतःचा विक्रम मोडावा लागेल. कुणीतरी पदक जिंकू शकते. कुणाचे पदक थोडक्‍यात हुकेल, त्याची हुरहुर त्यांना कायम राहील. मात्र, हा अनुभव घेऊन पुढच्या प्रवासाला निघावेच लागेल, हेच भारतीय धावपटूंना माझे सांगणे असेल. 

या वेळी जे भारतीय पदक जिंकतील ते नक्कीच नशीबवान असतील. कारण, त्यांना स्पर्धापूर्व अनेक सुविधा सहज उपलब्ध होत आहेत. आम्हाला सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागायची. त्यामुळेच पदकाचे क्षण आठवले, की खेळायला सुरवात केल्यापासून ते ध्येयपूर्तीपर्यंतचा कालावधी डोळ्यांसमोरून जातो. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतून मिळविलेल्या चार पदकांवर आजही समाधानी आहे. खूप काही करायचे राहून गेले असे अजिबात वाटत नाही. बॅंकॉक स्पर्धेत 1500 मीटरला ज्योतीर्मयी सिकदर, 5 हजार मीटर शर्यतीत इंडोनेशियाच्या धावपटू यांचे तगडे आव्हान होते. त्यात चार महिने आधी राष्ट्रीय शिबिरातून वगळण्यात आले होते. त्यामुळे या दडपणातही पदकाची कमाई माझी भूक वाढवणारी होती. पुढील 2002च्या स्पर्धेत चीन, जपानच्या धावपटूंचे आव्हान राहिले. त्यापूर्वीच्या सिडनी ऑलिंपिकमधील दुखापतीमुळे माझ्यावर टीका झाली होती. त्यामुळेच बुसानच्या स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक ब्रॉंझपदक मिळवून टीकाकारांना उत्तर दिल्याचे वेगळेच समाधान मी अनुभवले. 

एशियाडमधील भारताचे स्थान 3रे 
भारताला मिळालेली पदके 74 सुवर्ण 96 रौप्य 112 ब्रॉंझ 282 एकूण 
पुरुष 52 सुवर्ण, 64 रौप्य, 77 ब्रॉंझ 
महिला 22 सुवर्ण 32 रौप्य 35 ब्रॉंझ 
अन्य देशांची कामगिरी 
चीन 300 सुवर्ण 197 रौप्य 109 ब्रॉंझ 
जपान 151 सुवर्ण 186 रौप्य 203 ब्रॉंझ 
स्पर्धेचा कालावधी ः 
25 ते 30 ऑगस्ट 2018 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfied to answer commentators