Singapore Open : सात्त्विक-चिराग जोडीची उपांत्य फेरीत धडक; जागतिक क्रमवारीत अव्वल गोह-नूर मलेशियन जोडीवर मात

Satwik-Chirag Beat World No.1 Pair Goh-Noor : पुढील फेरीमध्ये भारतीय जोडीसमोर ॲरोन चिया - सोह वुई यिक या मलेशियन जोडीचे आव्हान असणार आहे. या जोडीला तिसरे मानांकन देण्यात आले आहे.
Satwik-Chirag Beat World No.1 Pair Goh-Noor
Satwik-Chirag Beat World No.1 Pair Goh-Nooresakal
Updated on

Satwik Chirag Singapore Open 2025,: भारताची पुरुष दुहेरीतील अनुभवी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सात्विक - चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत गोह स्झी फेई - नूर इझ्झुदीन या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जोडीवर २१-१७, २१-१५ अशी सरळ दोन गेममध्ये मात केली आणि अंतिम चार फेरीमध्ये प्रवेश केला. आता पुढील फेरीमध्ये भारतीय जोडीसमोर ॲरोन चिया - सोह वुई यिक या मलेशियन जोडीचे आव्हान असणार आहे. या जोडीला तिसरे मानांकन देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com