
Hong Kong Open 2025
sakal
हाँगकाँग : भारतीय खेळाडूंनी हाँगकाँग ओपन या सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी व पुरुष एकेरी अशा दोन विभागांत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने दुहेरीमध्ये आणि लक्ष्य सेन याने पुरुषांच्या एकेरीमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करीत अंतिम चार फेरीमध्ये धडक मारली.