
टोकियो : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील जोडीवर जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताची मदार असणार आहे. याप्रसंगी सात्त्विक-चिराग जोडी आपला शानदार फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तसेच उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत असलेल्या या जोडीला जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत.