
Satwik Chirag
sakal
शेनजेन (चीन) : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने चायना मास्टर्स या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुरुष दुहेरीत भारतीय जोडीने विजयी वाटचाल केली असली तरी पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेनच्या रूपात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे लक्ष्यचे आव्हान संपुष्टात आले.