BWF French Open : सात्विक - चिराग जोडीने मारली अंतिम फेरीत धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BWF French Open Badminton Final Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty

BWF French Open : सात्विक - चिराग जोडीने मारली अंतिम फेरीत धडक

BWF French Open Badminton : फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकराज रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरूष दुहेरीच्या जोडीने अंतिम फेरीत धडक मारली. या दोघांनी दक्षिण कोरियाच्या चोई सोल ग्यू आणि किम वॉन होचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय जोडीने कोरियन जोडीचा 21 - 18, 21- 14 अशा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. हा सामना 44 मिनिटे सुरू होता.

हेही वाचा: Virat Kohli One8 Commune : विराटनं रेस्तराँ चेन सुरू केली मात्र त्याचा सचिन अन् सेहवाग तर होणार नाही ना?

चिराग आणि सात्विकने सामन्यावर पहिल्यापासूनच मजबूत पकड निर्माण केली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या या जोडीने यंदाच्या वर्षी दोन BWF World Tour च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी जानेवारी महिन्यात इंडिया ओपन सुप 500 स्पर्धा जिंकली होती.

हेही वाचा: Glenn Phillips : न्यूझीलंडच्या फिलिप्सने 'मंकडिंग' चुकवण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल; VIDEO व्हायरल

फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सात्विक आणि चारगने वर्ल्ड चॅम्पियन जगातील क्रमांक 1 ची जोडी ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जापनच्या जोडाचा पराभव केला होता. भारताच्या या युवा जोडीने या वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा 23 - 21, 21 - 18 असा पराभव केला होता. हा सामना चिराग आणि सात्विकने 49 मिनिटात संपवला.