Badminton World Championships : चिराग - सात्विकसाईराज जोडीने रचला इतिहास! भारताचे पहिले पदक केले निश्चित

Satwiksairaj Reddy and Chirag Shetty Fixed First Ever Mens Double Medal In Badminton World Championships
Satwiksairaj Reddy and Chirag Shetty Fixed First Ever Mens Double Medal In Badminton World Championshipsesakal

Badminton World Championships : भारताची पुरूष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पदक निश्चित केले आहे. त्यांनी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा उंपात्यपूर्व फेरीत पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. आता जपानच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जोडीचा त्यांच्यात मयाभूमीत पराभव करत या जोडीने आपल्या दमदार कामगिरीचा डंक्का पुन्हा एदका वाजवला.

Satwiksairaj Reddy and Chirag Shetty Fixed First Ever Mens Double Medal In Badminton World Championships
UEFA Champions League : UEFA ग्रुप स्टेजचं वेळापत्रक जाहीर, वाचा कोण कोणाबरोबर भिडणार?

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेड्डी यांनी जपानच्या जोडीचा 24 - 22, 15-21, 21 - 14 असा पराभव केला. हा जबदस्त सामना 1 तास 15 मिनिटांपर्यंत रंगला. विशेष म्हणजे सात्विकसाईराज आणि चिराग ही बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली पुरूष जोडी ठरली आहे. भारताचे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील हे भारताचे दुसरे पदक आहे. यापूर्वी महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी 2011 मध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले होते.

Satwiksairaj Reddy and Chirag Shetty Fixed First Ever Mens Double Medal In Badminton World Championships
Virat Kohli : आशिया कपपूर्वी कोहलीने धोनीसाठी केली भावनिक पोस्ट; जिंकले सर्वांचे मन, 7+18 ❤️...

बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत यापूर्वी भारताची जोडी एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांना पराभव सहन करावा लागला. त्यांचा तीन वेळा सुवर्ण पदक जिंकणारी जोडी मोहम्मद एहसान आणि हेंद्रा सेतिआवान यांना या भारतीय जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत 8 - 21, 14 - 21 असा पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com