सौरव गांगुलीच्या कुटूंबापर्यंत पोहचला कोरोना; वाचा कोण कोण झाले बाधित...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

कोरोनाचा प्रार्दुभाव कोलकतामध्येही थांबण्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. देशातील अनेक शहरात कोरोनाने थैमान घातले आहे.

कोलकता ः कोरोनाचा प्रार्दुभाव कोलकतामध्येही थांबण्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. देशातील अनेक शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना योद्ध्यांसह बॉलीवूड, राजकीय क्षेत्रासह आता क्रीडा क्षेत्रातही कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. 

मोठी बातमी - २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला अमेरिकेत अटक...​

 बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहशिष गांगुली, त्याची पत्नी आणि तिच्या आई वडिलांना कोरोना झाल्याचे निदान गेल्या आठवड्यात झाले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत. स्नेहशिष हा स्वतः रणजी क्रिकेटपटू राहिलेला आहे. स्नेहशिष हा सध्या बंगाल क्रिकेट संघनेचा सचिव आहे. 

मोठी बातमी - मातेच्या गर्भातच बाळांना कोरोनाची लागण, मुंबईत जन्मताच तीन बालके कोरोना पॉझिटिव्ह​

स्नेहशिष आणि त्याचे कुटूंब सौरव गांगुलीच्या बेहेला येथील बंगल्यात राहात नसून त्याचे निवासस्थान वेगळ्या ठिकाणी आहे. शनिवारी त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार असून त्या निगेटिव्ह आल्यास स्नेहशिष याच्या कुटूंबाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु होताच गांगुलीने समाजकार्यात पुढाकार घेतला होता त्याने स्वतःचे ५० लाख रुपये दिल्यानंतर गरजूंना दोन हजार किलोचा भातही दिला. अम्फान चक्रीवादळाचा फटका बसलेल्यानाही गांगुलीने मदतीचा हात दिला होता.

कोरोनामुळे धारावी झाली 'बदनाम वस्ती', आता इथल्या नागरिकांना सहन करावा लायतोय 'हा' त्रास...

गांगुली यांना श्रीलंकेचा पाठींबा
कोलंबो ः  आयसीसीचे अध्यक्षपद मिळवण्याचा सौरव गांगुली यांचा मार्ग हळूहळू मोकळा होण्यास सुरूवात झाली आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाने गांगुली यांना पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे. या अगोदर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे क्रिकेट ऑपरेशन संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी काही दिवसांपूर्वीच गांगुली यांना जाहीर पाठींबा दाखवलेला आहे. सौरव गांगुली जर आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी मैदानात उतरणार असतील तर श्रीलंका क्रिकेट मंडळ त्यांना पाठींबा देईल, असे वृत लंका क्रिकेट मंडळाच्या हवाल्याने येथील वर्तमानपत्राने दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saurav ganguly brother snehashish ganguly tests positive for corona