मोठी बातमी - मातेच्या गर्भातच बाळांना कोरोनाची लागण, मुंबईत जन्मताच तीन बालके कोरोना पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - मातेच्या गर्भातच बाळांना कोरोनाची लागण, मुंबईत जन्मताच तीन बालके कोरोना पॉझिटिव्ह

एकूण 5 कोरोना पॉझिटिव्ह बाळांवर उपचार सुरू

मोठी बातमी - मातेच्या गर्भातच बाळांना कोरोनाची लागण, मुंबईत जन्मताच तीन बालके कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : मुंबईच्या वाडिया रूग्णालयात जन्मताच कोरोना संसर्ग झालेल्या 3 बाळांनी जन्म घेतला आहे. या बाळांच्या माता ही कोरोना पॉझिटिव्ह होत्या. गर्भामध्येच या बाळांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता रूग्णालयाने व्यक्त केली आहे. तर, आतापर्यंत रूग्णालयात एकूण 5 कोरोना पॉझिटिव्ह बाळांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा संसर्ग मातांच्या गर्भामध्येच नवजात बालकांना झाला आहे असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे, या संसर्गातून कसा मार्ग काढायचा हा देखील प्रश्न आता उपस्थित राहतायत. 

वाडिया रुग्णालयाने या आधीच याबाबतची माहिती पालिकेला दिली आहे. ही माहिती दिल्लीच्या आयसीएमआर ला देखील देण्यात आली आहे. या बाळांची SWAB चाचणी जन्म झाल्यानंतर 24 तासात करण्यात आली. त्यामुळे, या बाळाला प्रसूतीनंतरही कोरोनाचा संसर्ग झाला असू शकतो असं ही सांगण्यात येत आहे. 

मोठी बातमी - २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला अमेरिकेत अटक...

यातच रूग्णालयात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर उपचार सुरू असून ज्या वेळेस बाळांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळेस ते फक्त एका आठवड्याचे होते. दरम्यान, त्यांच्या माता कोविड पाॅझिटीव्ह असून त्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्या बाळांची स्वॅब चाचणी करण्यात आली. वाडिया रूग्णालयातील अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच ही बालके आणि त्यांच्या माता सुखरूप असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं पाहायला मिळतायत.  

कोविड मातांची यशस्वी प्रसूती करण्यात वाडिया तिसऱ्या क्रमांकावर - 

आतापर्यंत वाडिया रूग्णालयाने कोविडचा संसर्ग असलेल्या 100 मातांची यशस्वी प्रसूती करून मुंबईत सायन आणि नायरनंतर तिसरं स्थान मिळवले आहे. शिवाय, आतापर्यंत कोणत्याही अभ्यासात मातेपासून बाळाला जन्मताच किंवा गर्भातच कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे सिद्ध झाले नाही. 

मोठी बातमी२० सैनिकांच्या हौतात्म्याची जबाबदारी कुणाची? NCP च्या बड्या नेत्याचा खडा सवाल...

त्या तीन बाळांची आणि मातांची प्रकृती ठिक असून मातांच्या गर्भाशयातून संसर्ग झाला आहे. त्यामुळेच आम्ही पालिका आणि आयसीएमआरला याबाबतची माहिती दिली आहे. संशोधन होण्यासाठी पालिकेला सांगून सर्व माहिती आयसीएमआरपर्यंत पाठवण्यात आली आहे. आयसीएमआरच्या पुढच्या मार्गदर्शनाने पुढचे पाऊल घेतले जाईल. आयसीएमआर आणि सरकारने घालून दिलेल्या आदेशानुसार रूग्णालयात सर्व नियम पाळले जात आहे. पीपीई किट्स, स्वच्छता या सर्व गोष्टी पाळल्या जात आहेत. असं वाडिया रुग्णालयाच्या CEO डॉक्टर मिनी बोधनवाला यांनी सांगितलंय. 

three babies in wadia hospital detectde corona positive by birth first of its kind case observed in mumbai