बस आता रिषभ पंतला हाकला, साहाला घ्या 

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

रिषभ पंतला यष्टीरक्षणात अजून बरेच काही शिकायचे आहे त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वृद्धिमन साहाला खेळवा, पंतला वगळा असे स्पष्ट मत भारताचे माजी दिग्गद यष्टीरक्षक सैयद किरमाणी यांनी व्यक्त केले आहे. 

कोलकता :  रिषभ पंतला यष्टीरक्षणात अजून बरेच काही शिकायचे आहे त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वृद्धिमन साहाला खेळवा, पंतला वगळा असे स्पष्ट मत भारताचे माजी दिग्गद यष्टीरक्षक सैयद किरमाणी यांनी व्यक्त केले आहे. 

साहा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता आता तो तंदुरुस्त झाला असेल तर त्यालाही तेवढीच समान संधी मिळायला हवी, तो अजून झोपाळ्यात आहे, त्याच्याकडे भले दैवाची देण असेल तरिही त्याने अजून बरेच काही शिकायचे आहे, असे किरमाणी यांनी पंतबाबत बोलताना सांगितले. 
यष्टीरक्षण हा मैदानावरचा सर्वात कठिण काम आहे. हातात ग्लोव्ज घातले म्हणून कोणी यष्टीरक्षक होत नाही, असे सांगताना किरमाणी यांनी पंतला सुनावले आहे. साहाला दूर्दैवाने दुखापती झाल्या होत्या त्यामुळे त्याला आता समान संधी मिळायला हवी. राखीव म्हणून संघाबाहेर ठेवणे चुकीचे आहे, असेही किरमाणी म्हणाले. 
कोणत्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीवर जोखायला हवे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली त्यामुळे साहाला राष्ट्रीय संघात निवडण्यात आले होते. पण दुखापतीमुळे संघातून बाहेर गेल्यावर दुसरे कोणी तरी तुमची जागा घेत असतो त्याप्रमाणे दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत पुढे आले. आता फलंदाजीबरोबर यष्टीरक्षणाकही कोण सातत्यपूर्ण कामगिरी करतोय हे पहायला हवे आणि त्यालाच पुढे संधी द्यायला हवी, असे स्पष्ट मत किरमाणी यांनी मांडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sayyed Kirmani siggest to include wriddhiman saha instead of rishabh pant