School Basketball : शालेय बास्केटबॉल स्पर्धेत मिलेनियम, अमानोरा, आर्मी, विद्यांचलची विजयी घोडदौड
Under 14 Sports : पुण्यातील डेक्कन जिमखाना कोर्टवर झालेल्या अंडर-१४ शालेय बास्केटबॉल स्पर्धेत विविध शाळांनी जोरदार खेळ करत विजय मिळवला, विद्यार्थ्यांच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली.
पुणे : जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभागाच्या (मनपा) वतीने आयोजित चौदा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या शालेय बास्केटबॉल स्पर्धेत मिलेनियम स्कूल, अमानोरा स्कूल, आर्मी पब्लिक, पवार पब्लिक, विद्यांचल स्कूलने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.