Schoolympics 2023 : सकाळ स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत सिंहगड सिटी स्कूलच्या संघाने विजेतेपदावर कोरले नाव

Schoolympics 2023 : सकाळ स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत सिंहगड सिटी स्कूलच्या संघाने विजेतेपदावर कोरले नाव

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : पूनावाला फिनकॉर्प प्रेझेंट्स सकाळ स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत अंतिम  सामन्यात कोंढवा येथील सिंहगड सिटी स्कूलच्या संघाने जे.एन.पेटिट स्कूल, बंडगार्डन संघाचा तब्बल ९८ धावांनी एकतर्फी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. विजेत्या संघाच्या शिवरत्न सूर्यवंशी याने शानदार शतक झळकाविले.

येवलेवाडी येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर वरील स्पर्धा झाली. शिवरत्न सूर्यवंशी याच्या शतकी खेळीच्या जोरावर सिंहगड सिटी संघाने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. १८९ धावसंख्येच्या आव्हानासमोर जे.एन.पेटिट स्कूलचा डाव गडगडला. त्यांना ९० धावांपर्यंतच मजल मारता आली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात उरुळी कांचनच्या डॉ.अस्मिता स्कूलने केशवनगरच्या ऑर्बीज स्कूल संघावर ७ गडी राखून विजय मिळविला. अष्टपैलू खेळाडू सृजन बिचुकले सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक : अंतिम सामना - सिंहगड सिटी, कोंढवा : २० षटकांत ३ बाद १८८ (शिवरत्न सूर्यवंशी १०२, अमेय वीर ५५, प्रेम निंबाळकर २-४४) ९८ धावांनी विवि जे.एन.पेटिट, बंडगार्डन : २० षटकांत ८ बाद ९० (राज देवकर ३०, अमर शेट्टी २०, सिद्धार्थ डांगी ४-९)

तिसऱ्या क्रमांकाचा सामना : ऑर्बीज, केशवनगर : १९.४ षटकांत सर्वबाद ९१ (तरण वाघरे ४५, आरव बनसोडे २३, सृजन बिचुकले ४-५) ७ विकेटनी पराभूत वि डॉ. अस्मिता स्कूल, उरुळी कांचन : १४.२ षटकांत ३ बाद ९५ (संस्कार सोनवणे नाबाद ३८, सृजन बिचुकले २२, सौरभ पांडे नाबाद १५, दक्ष नगाळे १-१४)

उपांत्य फेरी ः जे.एन.पेटिट, बंडगार्डन : २० षटकांत १ बाद १४६ (प्रेम निंबाळकर नाबाद ७७, अमर शेट्टी ५६) १४ धावांनी विवि डॉ.अस्मिता स्कूल, उरुळी कांचन : २० षटकांत ५ बाद १३२ (सार्थक ढमढेरे ८०, ओम वाईकर ३५, देवेंद्र चौधरी ३-१५)

सामनावीर : प्रेम निंबाळकर

सिंहगड सिटी, कोंढवा : २० षटकांत ३ बाद १९७ (शिवरत्न सूर्यवंशी नाबाद ९८, अमेय वीर ३७, आदि साबळे १-९) ८८ धावांनी विवि ऑर्बीज, केशवनगर: १९.५ षटकांत सर्वबाद १०९ (संजीत लाहिरी ३३, हर्षवर्धन पंत २४, अनुष जाधव २-१५, सोहम कामठे १-४)

सामनावीर : शिवरत्न सूर्यवंशी

वयाच्या आठव्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणे महत्त्वाचे होते. स्पर्धेचे आयोजन उत्तम पद्धतीने झाले. अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देता आला याचा विशेष आनंद आहे.

- शिवरत्न सूर्यवंशी, सामनावीर,

सिंहगड सिटी स्कूल, सुवर्णपदक विजेता संघ

मी पाच वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. विवेक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी नियमित सराव करतो. भारतीय संघाकडून खेळण्याचे माझे स्वप्न आहे. विराट कोहली, जेम्स अँडरसन या खेळाडूंकडे बघून मला प्रेरणा मिळते.

- सृजन बिचुकले, सामनावीर, डॉ. अस्मिता स्कूल, उरुळी कांचन, ब्राँझपदक विजेता संघ

आमच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा तीनही आघाड्यांवर खेळाडूंनी लक्ष दिले. सुरुवातीपासून त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसून आले. त्यांच्या मानसिक आणि शारिरीक तंदुरुस्तीवर लक्ष दिल्याने हे यश मिळाले आहे.

- समीर साळवी, प्रशिक्षक, सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा

सकाळ स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेमध्ये आमच्या संघाने प्रथमच सहभाग घेतला होता. स्पर्धेचे नियोजन खूपच छान होते. आमच्या स्कूलमधील मुलांनी अप्रतिम खेळ केला आणि ब्राँझपदक मिळवले. या स्पर्धेतून मुलांना चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळाली.

- शंकर वाईकर, प्रशिक्षक,

डॉ.अस्मिता स्कूल, उरुळी कांचन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com