esakal | तेलंगणात होणाऱ्या हॉकी स्पर्धेसाठी पुण्यात निवड चाचणी; 'ही' कागदपत्रं आवश्यक
sakal

बोलून बातमी शोधा

Hockey Tournament

राज्य संघाची निवड चाचणी हॉकी महाराष्ट्र या राज्य संघटनेमार्फत क्रीडानगरी बालेवाडीत होणार आहे.

तेलंगणात होणाऱ्या हॉकी स्पर्धेसाठी पुण्यात निवड चाचणी

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : तेलंगणात (Telangana) होणाऱ्या मुलांच्या कनिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी (National Hockey Tournament) राज्य संघाची निवड चाचणी हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या (Hockey Maharashtra Association) वतीने क्रीडा नगरी, बालेवाडी (पुणे) येथे घेण्यात येणार आहे. तेलंगणात अकरावी कनिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धा ऑक्टोबरमध्ये आयोजित केली जाणार आहे.

या स्पर्धेत सहभागासाठी राज्य संघाची निवड चाचणी हॉकी महाराष्ट्र या राज्य संघटनेमार्फत क्रीडानगरी बालेवाडीत होणार असून या अंतर्गत 1 जानेवारी 2002 नंतर जन्म झालेल्या जिल्ह्यातील पाच खेळाडूंना बालेवाडीतील निवड चाचणीत सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंना निवड चाचणीत सहभागी होता येईल.

हेही वाचा: टेंडरसाठी राष्ट्रवादीत आलेल्यांना परळीत थारा नाही

त्यासाठी इच्छुक खेळाडूंनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्याच्या प्रमाणपत्रासोबत जन्म दाखला, हॉकी इंडियाकडे केलेली नोंदणी, कॉलेज किंवा शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड अशी कागदपत्रे घेऊन 12 सप्टेंबर 2021 रोजी चार वाजता घडसोली मैदान, फलटण येथे जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन दि हॉकी साताऱ्याचे अध्यक्ष बाहुबली शहा यांनी केले आहे. निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी महाराष्ट्राचे वरिष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांच्याकडे नाव नोंदणीही करावी. निवड समितीमध्ये महेश खुटाळे, सचिन धुमाळ, प्रवीण गाडे यांचा समावेश असणार आहे.

loading image
go to top