टेंडरसाठी राष्ट्रवादीत आलेल्यांना परळीत थारा नाही

Zilla Parishad Election
Zilla Parishad Electionesakal

सातारा : परळी खोऱ्यात राष्‍ट्रवादीने (NCP) आयोजिलेल्‍या मेळाव्‍यामुळे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale) यांच्‍यातील राजकारण शिगेला पोचले आहे. याच कारणावरून सध्‍या पत्रकबाजी सुरू असून, परळी येथील शशिकांत वाईकर (Shashikant Waikar) यांनी राष्‍ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे समर्थक व पंचायत समितीचे (Panchayat Committee) उपसभापती अरविंद जाधव यांनी वाईकरांवर टीका केली आहे. टेंडरसाठी राजकारणात शिरलेल्या ठेकेदारांना परळी भाग कधीही थारा देणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट करत ठेकेदारांना राष्ट्रवादीत का घ्यायचे याचा विचार पक्षाने करण्‍याची गरज असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले आहे.

Summary

टेंडरसाठी राजकारणात शिरलेल्या ठेकेदारांना परळी भाग कधीही थारा देणार नाही.

उपसभापती जाधव यांनी पत्रकात म्‍हटले आहे, की ठेकेदार शशिकांत वाईकर आणि मंडळींनी जिल्हा परिषदेची निवडणूक (Zilla Parishad Election) डोळ्यासमोर ठेऊन विकासाचे नव्हे, तर संधीसाधू राजकारण केले आहे. ज्यांनी आजवर परळी भागाच्या विकासासाठी एक दमडीही खर्च केली नाही, परळी भागातील लोकांसाठी कुठेही कधीही उभे राहिले नाही. कोरोना, अतिवृष्टी, पुनर्वसन आदी कोणत्याही सामाजिक प्रश्नावर कवडीचेही काम केले नाही, अशा मंडळींनी केवळ टेंडर मिळण्याच्या हेतूने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ज्यावेळी परळी भागातील लोक कोरोना, अतिवृष्टी आदी समस्यांनी त्रस्त होते. त्या वेळी ही मंडळी कुठे होती, असा सवालही जाधव यांनी पत्रकात उपस्‍थित केला आहे.

Zilla Parishad Election
'माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही'

पूर्वी उमेदवारी मिळाली नाही; पण आता मिळावी, या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आणि त्यातून टेंडर मिळावीत, या स्वार्थी हेतूने वाईकर आणि मंडळींचा खटाटोप सुरू आहे. अशा स्वार्थी लोकांना परळी भाग कधीही थारा देणार नाही. त्यामुळे अशा लोकांना पक्षात का घ्यायचे, याचा पक्षाने गांभीर्याने विचार करणे आवश्‍‍यक असल्‍याचे मतही जाधव यांनी पत्रकात व्‍यक्‍त केले आहे.

Zilla Parishad Election
राष्ट्रवादीसह भाजपचा बॅंका, पतसंस्थांवर 'डोळा'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com