esakal | विक्रमी विजयासह सेरेना विल्यम्सची आगेकूच
sakal

बोलून बातमी शोधा

Serena Williams

विक्रमी विजयासह सेरेना विल्यम्सची आगेकूच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क - आणखी एका विजयासह टेनिस इतिहासात आणखी विक्रम स्वतःच्या नावावर करत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत सेरेनाने स्विडनच्या योहाना लार्सन हिचे आव्हान ६-२, ६-१ असे सहज संपुष्टात आणले. तिचा हा ३०७वा विजय होता. टेनिस इतिहासात एखाद्या महिला खेळाडूने केलेली ही कामगिरी सर्वोत्तम ठरली. आपल्या झंझावती खेळाने तिने योहानाचे आव्हान बरोबर एक तासात परतवून लावले. तिची गाठ आता कझाकस्तानच्या यारोस्लावा श्‍वेडोवा हिच्याशी पडणार आहे. तिने चीनच्या झॅंग शुई हिचे आव्हान ६-२, ७-५ असे परतवून लावले. व्हिनस विल्यम्सनेदेखील आगेकूच कायम राखली असून, तिने २६व्या मानांकित लॉरा सिएगेमुंड हिचा ६-१, ६-२ असा फडशा पाडला.  

किर्गीओसची माघार

पुरुष विभागात विजेतेपदाचे स्वप्न बाळगणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओस याला मांडीच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्या वेळी तो ६-४,. ४-६, १-६ असा मागे होता. अँडी मरे याने इटलीच्या पाओलो लॉरेन्झी याचा कडवा प्रतिकार ७-६ (७-४), ५-७, ६-२, ६-३ असा मोडून काढला. ग्रिगॉर दिमित्रोव यानेही सातत्य कायम राखताना पोर्तुगालच्या जोआओ सौसा याचा चार सेटच्या लढतीत ६-४, ६-१, ३-६, ६-२ असा पराभव केला.