esakal | ॲलेक्‍सिस उद्‌गारला ‘लव्ह’, सेरेना विल्यम्स उत्तरली ‘येस’
sakal

बोलून बातमी शोधा

ॲलेक्‍सिस उद्‌गारला ‘लव्ह’, सेरेना विल्यम्स उत्तरली ‘येस’

ॲलेक्‍सिस उद्‌गारला ‘लव्ह’, सेरेना विल्यम्स उत्तरली ‘येस’

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क - अमेरिकेची मातब्बर टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिचा वागनिश्‍चय झाला आहे. ॲलेक्‍सिस ओहानीयन असे वाग्दत्त वराचे नाव आहे. तो रेड्डीट या सोशल मीडिया कंपनीचा सहसंस्थापक आहे. या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हे जाहीर केले. या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी दोघे रोमला जाणार आहेत. तेथेच त्यांची पहिली भेट झाली होती. ३५ वर्षांच्या सेरेनाने म्हटले आहे, की ‘एका गुडघ्यात झुकून तो चार अक्षरी शब्द (लव्ह) म्हणाला अन्‌ मी होकार दर्शविला. मी थोडी उशिरा घरी आले. कुणीतरी माझी बॅग भरून ठेवली होती. गाडी वाट पाहात होती. प्रवासाला जाण्याचे ठिकाण - रोम! जेथे आमची सर्वप्रथम नजरानजर होऊन ग्रह जुळले...!’

ॲलेक्‍सिस ३३ वर्षांचा आहे. त्याने फेसबुक पेजवर, ‘शी सेड येस’ असे म्हणत सेरेनाच्या होकाराची ‘गुड न्यूज’ दिली आहे. इतर काही संकेतस्थळांवरील माहितीनुसार रोममध्ये एका ठिकाणी एका टेबलपाशी या दोघांची योगायोगाने भेट झाली. आता वागनिश्‍चयानंतर त्याच ठिकाणी जात वर्तुळ पूर्ण करण्याची त्यांची इच्छा आहे. सेरेनाने म्हटले आहे, की ‘तेव्हा आम्ही योगायोगाने भेटलो. हा योग मात्र त्याने आपल्या पसंतीने आणला. गुडघ्यावर झुकून त्याने आपली भावना सूचक पद्धतीने व्यक्त केली.’