Mohammed Shami: मोहम्मद शमीला कोर्टाचा दणका! पत्नी हसीन जहाँला द्यावे लागणार महिन्याला लाखोंची पोटगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasin Jahan On Mohammed Shami

Mohammed Shami: मोहम्मद शमीला कोर्टाचा दणका! पत्नी हसीन जहाँला द्यावे लागणार महिन्याला लाखोंची पोटगी

Hasin Jahan On Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

कोलकाता न्यायालयाने भारतीय वेगवान गोलंदाजाला त्याची पत्नी हसीन जहाँला मासिक पन्नास हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. अलीपूर न्यायालयाच्या न्यायाधीश अनिंदिता गांगुली यांनी या प्रकरणाचा निकाल दिला.

हेही वाचा: IND vs WI: T20 विश्वचषकापूर्वी हरमनप्रीत-मंधानाचा तांडव! वेस्ट इंडीजला चारली पराभवाची धूळ

मात्र, हसीन जहाँ या रकमेवर खूश नाही. कारण त्याने महिन्याला 10 लाख रुपयांची मागणी केली होती. 2018 मध्ये हसीन जहाँने 10 लाख रुपये मासिक पोटगीची मागणी करणारी कायदेशीर याचिका दाखल केली होती.

हसीन जहाँने याचिकेत म्हटले होते की, तिला वैयक्तिक खर्चासाठी 7 लाख रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी दरमहा 3 लाख रुपये पोटगी हवी आहे. हसीन जहाँ आता या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकते.

हेही वाचा: ICC Men's T20I Team : विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या बाबर आझमला आयसीसीचा ठेंगा!

2018 मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप आला होता. शमीची पत्नी हसीन जहाँने या दिग्गज व्यक्तीवर घरगुती हिंसाचार, मॅच फिक्सिंग, हुंडाबळी असे गंभीर आरोप केले होते. यानंतर मोहम्मद शमीने पत्नीच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. नंतर शमी आणि हसीन जहाँ वेगळे झाले.

हेही वाचा: IND vs WI: T20 विश्वचषकापूर्वी हरमनप्रीत-मंधानाचा तांडव! वेस्ट इंडीजला चारली पराभवाची धूळ

मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने 6 षटकात केवळ 18 धावा दिल्या आणि न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

शमीने 29व्यांदा वनडेत तीन किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीसाठी शमीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. उभय संघांमधला तिसरा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळल्या जाणार आहे.

एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही देश टी-20 मालिकेतही सहभागी होतील ज्यामध्ये मोहम्मद शमीचा सहभाग नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शमीची संघात निवड झाली आहे.