IND vs WI: T20 विश्वचषकापूर्वी हरमनप्रीत-मंधानाचा तांडव! वेस्ट इंडीजला चारली पराभवाची धूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Mandhana and harmanpreet kaur

IND vs WI: T20 विश्वचषकापूर्वी हरमनप्रीत-मंधानाचा तांडव! वेस्ट इंडीजला चारली पराभवाची धूळ

India Women vs West Indies Women, 3rd Match: दक्षिण आफ्रिकेत पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या महिला T20 विश्वचषकापूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिरंगी मालिका खेळण्यासाठी पोहोचला आहे, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघ भारतासोबत खेळत आहेत.

हेही वाचा: Asia Cup 2023 : अखेर ACC अध्यक्ष जय शहांनी PCB अध्यक्ष नजम सेठींना दिला दिलासा

या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला, ज्यामध्ये भारतीय महिला संघाने 27 धावांनी विजय मिळवला. तर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी लंडनमधील बफेलो पार्क येथे खेळल्या गेलेल्या T20I तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजचा 56 धावांनी पराभव केला. भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. मंधानाला तिच्या या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

हेही वाचा: Women IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या क्षणी महिला आयपीएलमधून घेतली माघार

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने कर्णधार हरमनप्रीत कौर (56) आणि सलामीवीर स्मृती मानधना (74) यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवला आणि कॅरेबियन संघाचा 56 धावांनी धुव्वा उडवला. अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाला पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या संघाशी सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा: ICC Men's T20I Team : विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या बाबर आझमला आयसीसीचा ठेंगा!

बफेलो पार्क येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, यामध्ये हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला संघाने 20 षटकात 2 गडी गमावून 167 धावा केल्या. घातले.

लक्ष्याचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजची सुरुवात खराब आणि संथ झाली, ती शेवटपर्यंत सावरण्यात अपयशी ठरली आणि 4 गडी गमावून केवळ 111 धावाच करू शकल्या. अवघ्या 25 धावांत 3 विकेट पडल्या, त्यानंतर शेमेन कॅम्पबेले आणि कर्णधार हेली मॅथ्यूज यांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. कॅम्पबेलने 47 आणि मॅथ्यूजने नाबाद 34 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने दोन, राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.