SGFI Election : सुशील कुमारनं मारलं मैदान; महाराष्ट्राच्या शिरपेचात महासचिवपद

SGFI Election : सुशील कुमारनं मारलं मैदान; महाराष्ट्राच्या शिरपेचात महासचिवपद

सातारा : स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाची (School Games Federation Of India) कार्यकारिणीची पुन्हा एकदा निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान यांची महासचिवपदी निवड झालेली आहे. तर सन 2006 पासून राष्ट्रीय शालेय महासंघ (एसजीएफआय) याचे अध्यक्षपद ऑलिंपिकपटू सुशिल कुमार याची अध्यक्षपदी फेर निवड झालेली आहे. याबाबतची माहिती ई- सकाळला सर्वाेच्च न्यायालयाचे वकील बी.एस.माथूर यांच्या माध्यमातून क्रीडा संपर्क सूत्रांनी दिली. 

डिसेंबर 2020 मध्ये तामिळनाडूच्या नागापट्टिनम शहरात झालेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसजीएफआय) निवडणुका रद्द करण्यात आल्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात क्रीडा मंत्रालयाने केली हाेती. एसजीएफआयचे अध्यक्ष ऑलिम्पिक पदकविजेते सुशील कुमार यांच्या परवानगीशिवाय त्यावेळी निवडणुक झाल्याने प्रक्रिया रद्द झाली. 

राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता 2011 (एनएसडीसीआय) तरतुदीनुसार पुन्हा निवडणुका घेण्याचे निर्देश मंत्रालयाने फेडरेशनला दिले होते. एसजीएफआयचे सरचिटणीस राजेश मिश्रा यांनी यांनी सुशीलची संमती न घेता एक रिटर्निंग ऑफिसरची (आरओ) नियुक्त करून निवडणुका घेतल्या होत्या. एनएसडीसीआयमध्ये नमूद केलेल्या आदर्श निवडणुकीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित महासंघाच्या अध्यक्षांकडे आरओ नेमण्याचे अधिकार आहेत. अध्यक्ष मंजूरीशिवाय रिटर्निंग ऑफिसरच्या नियुक्तीपासून एनएसडीसीआयचे उल्लंघन झाल्याने एनएसडीसीआय मध्ये नमूद केलेल्या निवडणूक मार्गदर्शक सूचनांच्या तरतुदीनुसार पुन्हा निवडणुका घेण्यास क्रीडा मंत्रालयाने सूचित केले होते.

त्यानूसार नुकतीच निवड प्रक्रिया झाली. अशी आहे कार्यकारणी - अध्यक्ष (सुशिल कुमार, दिल्ली) , उपाध्यक्ष झिशेन अमीर (आयएएस, झारखंड), असरपाल सिंग (लक्षदीप), पार्थ पेगू (आसाम), ऋबिंदूरजीत सिंग बरार (चंदीगढ), विकास श्रीवास्तव (उत्तर प्रदेश), पी. नाराससिंगमे (पदुचेरी), सौकन सिंग (अरुणाचल प्रदेश), भागाराम हाऊता (हिमाचल प्रदेश), महासचिव - विजय संतान (महाराष्ट्र), सहसचिव - पोईमोंग मोग (त्रिपुरा), जे.आर. मारक (मेघालय), एम. वासू (तामिळनाडू), अनिल मिश्रा (छत्तीसगढ), सत्यनारायण रायगुरु (ओडिशा), डेविड साईलो (मिझोराम), हरिंदर ग्रेवाल (पंजाब), गोपाल कृष्ण (कर्नाटक). खजिनदार - सुरेंद्र भाटी (राजस्थान). कार्यकारिणी सदस्य - लेपचा (सिक्कीम), मिथिलेश कुमार (बिहार), नागेंद्रसिंग बारटवाल (उत्ताराखंड), उषा सिंग (मध्यप्रदेश), मानसिंग सम्राट (दिवदमण), समीर पांचाल (गुजरात).

Don't Worry : यमदूताने गाठण्यापूर्वी तुम्हाला मिळेल मदत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com