शादाब खानचा ऑलराउंड शो, विंडीजचा मालिकेत 3-0 ने क्लीनस्वीप

यजमान पाकिस्तान संघानेही पाहुण्यांचा मालिकेत 3-0 असा धुव्वा उडवला
PAK vs WI 3rd ODI
PAK vs WI 3rd ODI

PAK vs WI 3rd ODI: शादाब खानच्या झंझावाती खेळीमुळे वेस्ट इंडिजने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजचा 53 धावांनी पराभव केला. यासह यजमान पाकिस्तान संघानेही पाहुण्यांचा मालिकेत 3-0 असा धुव्वा उडवला. पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजला एकही सामना जिंकण्याची संधी मिळाली नाही. पावसाने प्रभावित तिसऱ्या एकदिवसीय सामना ४८-४८ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 9 गडी बाद 269 धावा केल्या. त्याच्यासाठी शादाब खानने सर्वाधिक 86 धावा केल्या आणि सलामीवीर इमाम-उल-हकने 62 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने 4 विकेट घेतल्या.

वेस्ट इंडिजचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना 37.2 षटकांत 216 धावांत गारद झाला. वेस्ट इंडिजकडून अकील हुसेनने सर्वाधिक 60 धावा केल्या तर केसी कार्टीने 33 धावांचे योगदान दिले. शाई होप आणि कीमो पॉल यांनी 21-21 धावा केल्या. कर्णधार निक्लोस पूरन 11 धावा करून बाद झाला. पाकिस्तानसाठी शादाब खानने एकूण 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर इमाम-उल-हक आणि फखर झमान यांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. सुरूवात चांगले मिळाल्यानंतर पाकिस्तानचा डाव डगमगला 117 धावांवर 5 विकेट गेल्या होत्या. यानंतर शादाब खानने खुशदिल शाहच्या बरोबर डाव सांभाळला. दोन्ही फलंदाजांनी सहाव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. खुशदिल 34 धावावर बाद झाल्यानंतर शादाबने मोहम्मद वसीमसह आठव्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली.

शादाब खानला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले तर इमामल-उल-हकला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. याआधी पाकिस्तानने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विंडीजचा क्लीन स्वीप केला होता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या मालिकेत एकूण 181 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com